How To Make fluffy Rice : तांदूळ तोच पण भात कधी गचका होतो तर कधी करपतो? ५ टिप्स, परफेक्ट होईल भात
Updated:September 1, 2025 17:12 IST2025-09-01T16:55:31+5:302025-09-01T17:12:07+5:30
What Is Correct Way To Cook Rice : कुकरऐवजी पातेल्यात भात शिजवत असाल तर अर्धवट शिजवून मग पाणी काढून घ्या मग पुन्हा थोडावेळ शिजवा.

वरण भात म्हणजे सर्वांचाच आवडता पदार्थ (Cooking Hacks). सणवार असो किंवा आपलं रोजचं जेवण वरण भाताशिवाय अपूर्ण आहे. भात कधी गचगचीत होतो तर कधी करपतो हवा तसा मोकळा होत नाही अशी बऱ्याच जणींची तक्रार असते. परफेक्ट भात होण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (How To Cook Rice perfectly)
भात करण्यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरा. नवीन तांदळात स्टार्च असते. ज्यामुळे भात चिकट होऊ शकतो. आंबे-मोहोर, इंद्रायणी, बासमती प्रत्येक तांदळाला पाणी वेगवेगळ्या प्रमाणात लागते. (Why my Rice Is Not Fluffy)
भात स्वच्छ धुणंसुद्धा महत्वाचं आहे. २ ते ३ वेळा भात नीट धुतला तर त्यातील स्टार्च निघून जातं आणि भात मऊ-मोकळा होतो.
भात शिजवताना १ चमचा तेल किंवा तूप घातल्यास भात मऊ होतो. तुम्ही यात काही थेंब लिंबाचा रसही घालू शकता.
कुकरऐवजी पातेल्यात भात शिजवत असाल तर अर्धवट शिजवून मग पाणी काढून घ्या मग पुन्हा थोडावेळ शिजवा.
भात चिकट झाला असेल तर मोकळ्या भांड्यात पसरवा. थंड होऊ द्या. यामुळे भात मोकळा होईल.
भात शिजल्यानंतर लगेच झाकण काढू नका ज्यामुळे तो चिकट होतो. भात शिजल्यानंतर भांडं पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढा.