भाजीत तेल जास्त झाले? ४ सोपे उपाय- पदार्थ बिघडणार नाही, होईल अधिक चविष्ट
Updated:June 22, 2025 19:00 IST2025-06-22T18:56:52+5:302025-06-22T19:00:14+5:30
reduce oil in vegetables easily: healthy cooking tips at home: आपल्याकडूनही सुक्या भाज्यांमध्ये तेल जास्तीचे पडले तर घाबरू नका. सोपे उपाय केल्यास पदार्थ बिघडणार नाही.

अनेकदा भाजी बनवताना आपला तेल घालण्याचा अंदाज चुकतो. यामुळे भाजी खूपच तेलकट आणि चिकट होते. चवीला खराब नाही पण आरोग्यासाठी इतके तेल चांगले नाही. (reduce oil in vegetables easily)
ग्रेव्ही भाज्यांमधून तेल कमी करण्यासाठी बर्फाचा अनेकदा वापर केला जातो. परंतु, सुक्या भाज्यांमधून तेल काढताना काय करावं सुचत नाही. (healthy cooking tips at home)
जर आपल्याकडूनही सुक्या भाज्यांमध्ये तेल जास्तीचे पडले तर घाबरू नका. सोपे उपाय केल्यास पदार्थ बिघडणार नाही.
पॅनमध्ये भाजी शिजवल्यानंतर मध्यभागी लहान वाटी ठेवा. ज्यामुळे जास्तीचे तेल वाटीच्या खाली जमा होईल. नंतर चमच्याच्या मदतीने तेल काढा.
तेल शोषण्यासाठी आणि टिश्यू पेपर किंवा किचन टॉवेलचा वापर करु शकतो. टिश्यू पेपर ताटात पसरवून त्यावर भाजी पसरवा. यामुळे अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल.
ब्रेडचे तुकडे किंवा पाव हा टिश्यू पेपरसाठी चांगला पर्याय आहे. भाजी एका भांड्यात काढून त्यावर ब्रेडचे काही छोटे तुकडे करुन पसरवा. यामुळे तेल शोषले जाईल.
जर भाजी थोडी घट्ट करायचे असेल तर आपण त्यात बेसन किंवा गव्हाचे पीठ घालू शकतो. पॅनमध्ये १ ते २ चमचे बेसन किंवा गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. त्यावंतर भाजीमध्ये घाला. ज्यामुळे भाजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल.