आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

Published:October 23, 2023 08:00 AM2023-10-23T08:00:00+5:302023-10-23T08:00:02+5:30

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

नवरात्रीच्या नवरंगातील आजचा शेवटचा रंग मोरपिसी (Peacock Green). नवरंगातील प्रत्येक रंगांचे जसे आपले असे विशिष्ट महत्व असते तसेच याही रंगाचे खास असे महत्व आहे. आपल्या ताटात इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणेच हिरवा, लाल, जांभळा, पिवळा आणि नारिंगी यांसारखे विविध रंगांचे पदार्थ असणे आवश्यक आहे. याचा अर्थ या वेगवेगळ्या रंगांच्या फळे, भाज्या व पदार्थांमधून शरीरासाठी विविध पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतात. आजच्या मोरपिसी रंगांचे नेमके कोणते पदार्थ खावेत हे पाहुयात(Today's Color Peacock Green : Check out 7 Nutritious Peacock Green Foods, Include In Your Diet).

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

अळूची भाजी वर्षभर मिळते परंतु पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूच्या पानांची भाजी अधिक जास्त चांगली लागते. अळू, हरभरा, गूळ या लोहयुक्त पदार्थांमुळे अळूची पातळ भाजी अतिशय पौष्टिक असते. अळूच्या या पातळ भाजीला अळूचं फदफद देखील म्हणतात.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

पराठा हा असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नाश्त्याला किंवा जेवणाला बनवतो. मेथी - पालकच्या पानांना बारीक चिरून कणकेत मिसळून आपण झटपट होणारे मेथी - पालक पराठे बनवू शकतो.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

पिअर हे एक मऊ, गोड फळ आहे जे सफरचंदापेक्षा आकाराने थोडे लहान असते. हे वरच्या बाजूला थोडे बारीक आणि खालून गोल आकारात असते, ज्याला पीअर शेप म्हणतात. पिअर हे भरपूर प्रमाणात पोषक असतात जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

पनीरपासून बनणा-या सर्व डिशेपैकी पालक पनीर ही सर्वात लोकप्रिय रेसिपी मानली जाते. पालकमध्ये लोह व पनीरमध्ये प्रोटीनची भरपूर मात्रा असल्यामुळे या डिशचा समावेश हेल्दी रेसिपीजमध्ये केला जातो. ही डिश नान, पराठा आणि जीरा राईसोबत सर्व्ह केली जाते.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

ड्रायफ्रुट्समधील ‘पिस्ता’ हा पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता अतिशय पोषक आणि फायबरचे प्रमाण अधिक असणारे ड्रायफ्रुट आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

किवीमध्ये आरोग्यासाठी खूप महत्वाचे असलेले अनेक पोषक घटक असतात. यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे लोक आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतात त्यांनी किवी नक्कीच खावी. या फळामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन - सी आणि फायबर असतात. जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. दररोज एक मध्यम आकाराची किवी खाणे आपल्यासाठी उपयुक्त ठरते.

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

अळूच्या भाजीची आणखी एक स्पेशल रेसिपी म्हणजे अळूच्या कुरकुरीत चविष्ट अशा वड्या. सणावाराला आपल्याकडे आवर्जून या वड्या केल्या जातात. बेसन, तांदळाचे पीठ आणि मसाल्याचे पदार्थ एकत्रित करून अळुचे पान पसरून त्यात हे सारण भरतात. त्याचे वेटोळे करतात आणि वाफवतात.