रेस्टॉरंटस्टाईल पनीरची ग्रेव्ही करण्याच्या ५ टिप्स! रंग, चव, सुगंध एकदम परफेक्ट - खा मनसोक्त...
Updated:October 29, 2025 10:00 IST2025-10-29T10:00:00+5:302025-10-29T10:00:02+5:30
tips & tricks to make restaurant style creamy paneer gravy at home : restaurant style paneer gravy recipe : how to make creamy paneer gravy at home : घरच्याघरीच हॉटेलसारखी चवदार आणि क्रीमी पनीरची भाजी झटपट तयार करण्यासाठी खास टिप्स...

घरी पाहुणे येणार असले किंवा काही खास कार्यक्रम, सणवार असल्यास, पनीरची स्पेशल (how to make creamy paneer gravy at home) रस्सेदार भाजी हमखास तयार केली जाते. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी पनीरची चविष्ट आणि चमचमीत ग्रेव्ही खातो, तशीच भाजी घरी तयार करायचा प्रयत्न केला तरी तशी परफेक्ट होतच नाही. पण, अनेकदा घरच्या भाजीला हॉटेलसारखी ती खास चव, गडद रंग किंवा मखमली टेक्श्चर येत नाही.
घरीच पनीरची भाजी करताना कितीही मेहनत घेतली तरी (restaurant style paneer gravy recipe) हॉटेलसारखी चव, रंग आणि ग्रेव्हीच टेक्श्चर येत नाही, असं अनेकदा होतं. पण काही सोप्या टिप्स आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या खास ट्रिक्स माहित असतील, तर अगदी घरच्या घरी आपणही हॉटेलसारखी चवदार आणि क्रीमी पनीरची भाजी झटपट तयार करु शकता.
हॉटेलसारखीच परफेक्ट पनीरची ग्रेव्ही भाजी तयार करण्यासाठी सुप्रसिद्ध मास्टरशेफ (how to make creamy paneer gravy at home) पंकज भदौरिया यांनी खास टिप्स आणि सिक्रेट्स सांगितल्या आहेत त्या पाहूयात..
१. ग्रेव्ही गुपच आंबट झाल्यास :-
अनेकदा पनीरची ग्रेव्ही असणारी चमचमीत भाजी घरीच तयार करताना, त्यातील टोमॅटोमुळे भाजीच्या ग्रेव्हीला आंबटपणा येतो. आंबटपणामुळे काहीवेळा या भाजीची चव बिघडते. पनीरच्या भाजीच्या ग्रेव्हीचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात प्रत्येकी १/२ ते १ टेबलस्पून साखर, गूळ, मिल्क पावडर किंवा फ्रेश क्रीम घालू शकता. यापैकी कोणताही एक पदार्थ घातल्यास ग्रेव्हीचा आंबटपणा कमी होतो.
२. ग्रेव्ही खूपच पातळ झाली :-
झाकण न ठेवता ग्रेव्हीला २ ते ३ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. यामुळे अतिरिक्त पाणी कमी होऊन ग्रेव्ही नैसर्गिकरित्या दाट होईल. ग्रेव्हीमध्ये असलेले पनीरचे काही तुकडे घेऊन ते चमच्याने किंवा स्पॅच्युलाने ग्रेव्हीतच मॅश करा. मॅश केलेले पनीर ग्रेव्हीला त्वरित दाटपणा आणि मखमली टेक्श्चर देते. १ चमचा मगज बी पेस्ट गरम पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घाला. ही पेस्ट हॉटेलस्टाईल ग्रेव्हीचा दाटपणा आणि चव दोन्ही वाढवते. ग्रेव्हीला खूप दाटपणा हवा असेल, तर १/२ चमचा कॉर्नफ्लोअरची स्लरी पाण्यात मिसळून घाला.
३. पनीर चिवट किंवा रबरासारखे होते :-
पनीरची भाजी करताना काहीवेळा पनीर रबरी किंवा चिवट होते, असे होऊ नये म्हणून पनीर वापरण्यापूर्वी, त्याला कोमट, किंचित खारट पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे पनीर मऊ आणि ओलसर राहते. ग्रेव्हीत पनीर घातल्यानंतर भाजीला जोरात उकळी (Hard-boil) आणू नका. पनीर जास्त शिजवल्यास ते चिवट होते. पनीर घातल्यावर भाजी मंद आचेवर शिजवा आणि नंतर लगेच गॅस बंद करून १ मिनिट झाकण ठेवून भाजीला विश्रांती द्या.
४. भाजीला परफेक्ट रंग येण्यासाठी :-
बरेचदा भाजीला हवा तसा रंग येत नाही, रंग खूपच फिका दिसतो. अशावेळी, एका छोट्या भांड्यात १ चमचा तूप गरम करा. त्यात १/२ ते १ चमचा काश्मिरी मिरची पावडर घाला आणि लगेच गॅस बंद करा. हे तयार मिश्रण भाजीत घाला. यामुळे भाजीला परफेक्ट हॉटेलसारखा चमकदार रंग येतो.
५. भाजीला चवच लागत नसेल तर :-
भाजीची चव फिकी लागत असेल तर, भाजी गॅसवरून उतरवण्यापूर्वी त्यात कसुरी मेथी हातावर चोळून घाला तसेच १/२ चमचा गरम मसाला आणि १ चमचा बटर घालून चांगले मिसळा. हे सर्व घटक घातल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजीला झाकण ठेवून १ मिनिट विश्रांती द्या. कसुरी मेथी आणि गरम मसाला ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखी ती खास, तीव्र चव आणि सुगंध देतात, तर बटर मखमली टेक्श्चर आणि चमक वाढवते.