स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

Updated:February 20, 2025 17:24 IST2025-02-20T17:13:55+5:302025-02-20T17:24:31+5:30

Kitchen Tips : these easy cooking hacks will make work easier for woman : 7 simple tips for quick & good cooking time will be saved & work will be done quickly : स्वयंपाक करण्यापूर्वी थोडे योग्य पद्धतीने नियोजन केले तर स्वयंपाक देखील पटकन करु शकतो...

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

सकाळी झोपेतून उठलं की महिलांची सगळ्यात आधी घाई असते ती स्वयंपाकाची. एकीकडे ब्रेकफास्ट, एकीकडे डब्याची तयारी. महिला वर्गाचा सर्वाधिक वेळ जाणारे काम म्हणजे स्वयंपाकाचे. यातही स्वयंपाकाबरोबरच इतर लहानसहान कामात जास्त वेळ जातो. पण थोडे योग्य पद्धतीने नियोजन (7 simple tips for quick & good cooking time will be saved & work will be done quickly) केले तर आपण झटपट आणि उत्तम स्वयंपाक करु शकतो (Kitchen Tips). त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते पाहूया...

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

जर तुम्हांला कोणतीही ग्रेव्ही किंवा रस्सेदार भाजी करायची असेल तर तुम्ही टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही आधीच जास्तीची तयार करून ठेवा. ही ग्रेव्ही बर्फाच्या ट्रे मध्ये घालून फ्रिजरमध्ये ठेवून स्टोअर करा. आयत्यावेळी तुम्ही हे ग्रेव्हीचे तयार क्यूब्स वापरुन झटपट भाजी तयार करु शकता. पनीर, मटार - बटाटा अशा ग्रेव्हीच्या भाज्या पटकन तयार करता येतील.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कोणतीही भाजी करणार त्या भाजीसाठी लागणारे साहित्य आणि इतर तयारी आदल्या रात्रीच करून ठेवा. सर्व भाज्या एक दिवस आधीच कापून घ्या आणि हवाबंद पिशवी किंवा डब्यांत स्टोअर करुन ठेवा. असे केल्याने तुमचा वेळ वाचेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही भाज्या हलक्या उकळवून देखील स्टोअर करु शकता, जेणेकरुन भाज्या शिजवायला जास्त वेळ जाणार नाही.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

भाज्या शिजवताना तुम्ही त्यात वेगवेगळे मसाले वापरता. हे करायला वेळ लागतो आणि थोडा त्रासदायकही आहे. यामध्ये तुम्ही धणे, मिरची, हळद, जिरे, गरम मसाला आणि भाजीपाला मसाला पावडर असे सर्व मसाले एकत्र करून एका बॉक्समध्ये ठेवा.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

रवा, दलिया, शेंगदाणे असे काही पदार्थ वापरण्यापूर्वी भाजावे लागतात. असे पदार्थ आपण एकदम एकाचवेळी जास्तीचे भाजून डब्यांत स्टोअर करून ठेवू शकता. जेणेकरुन घाई गडबडीच्या वेळी असे पदार्थ भाजून घेण्याचा वेळ वाचू शकेल. तसेच भाजून ठेवलेले पदार्थ लगेच वापरुन आपल्याला पदार्थ पटकन तयार करता येऊ शकतात.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

अन्नपदार्थ तयार करताना आपण लसूण, आलं, हिरव्या मिरच्या कोथिंबीर यांसारख्या पदार्थांचा वापर करतो. अशा परिस्थितीत, लसूण आलं सोलून ठेवावं. कोथिंबीर निवडून ठेवावी. याचबरोबर मेथी, पालक, गवार, भेंडी यांसारख्या भाज्या सोलून किंवा निवडून ठेवाव्यात.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

बऱ्याचदा आपल्याला काही भाज्या किंवा उसळी यांच्यासाठी वाटण लागते. ऐनवेळी खोबरे वाटत बसल्यास खूप वेळ जातो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी खोबरे वाटून ठेवावे. इतकेच नाही तर आलं लसूण पेस्ट ही जेवणात अनेकदा लागणारी गोष्ट. लसूण सोललेला असला तरी मिक्सरवर आलं, लसूण बारीक करण्यात घाईच्या वेळी वेळ जातो. अशावेळी आलं-लसूण पेस्ट तयार असेल तर काम झटपट होते.

स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो? घ्या ७ कुकिंग टिप्स, स्वयपांक होईल झटपट - वेळही वाचेल...

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला, जेवायला आणि रात्रीसाठी काय करायचे याचे नियोजन आधीच करुन ठेवा. म्हणजे ऐनवेळेला आता काय करायचे इथपासून सुरुवात होणार नाही. डोक्यात काय करायचे हे एकदा नक्की असेल की उठल्यावर झटपट कामाला लागता येते. इतकेच नाही तर आदल्या रात्रीच उद्या काय करायचे हे नक्की असेल तर झोपण्यापूर्वी थोडी किमान तयारी करता येते.