Summer Special: ताज्या करकरीत कैरीचे चविष्ट पदार्थ, रायते-पन्हे-लोणचे-साखरांबा-अस्सल मराठी चवीचे पदार्थ
Updated:April 3, 2025 19:31 IST2025-04-02T16:07:20+5:302025-04-03T19:31:29+5:30

कैरीचा सिझन म्हणजे उन्हाळ्याचे ३ ते ४ महिने. नंतर वर्षभर पुन्हा ताज्या कैरीचे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळत नाहीत. म्हणूनच आता कैऱ्या मिळत आहेत तर त्या भरपूर घ्या आणि त्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खा (summer special recipe of raw mango)... एकाच कैरीचे बघा किती वेगवेगळ्या चवींचे वेगवेगळे पदार्थ होऊ शकतात...(different recipies of raw mango or kairi)
ताज्या कैरीचं अगदी झटपट इंस्टंट लोणचं करता येतं. जेवणात तोंडी लावायला असं लोणचं असेल तर जेवणाची मजा निश्चितच जास्त वाढते...
कैरीचा तक्कू करून आपण तो वर्षभरसुद्धा साठवून ठेवू शकतो. भात, खिचडीसोबत खायला तर तो अतिशय छान लागतो.
मेथांबा हा कैरीचा असाच एक गोड, तिखट, आंबट आणि किंचित कडवट चव असणारा चटपटीत पदार्थ.. त्यातल्या मेथ्यांमुळे त्याची चव छान खुलून येते.
साखरआंबा हा पदार्थ तर लहान मुलांच्या विशेष आवडीचा. तो याेग्य पद्धतीने तयार केला गेला तर अगदी ७ ते ८ महिने छान साठवून ठेवता येतो.
ज्यांना साखरआंबा नको असतो त्यांच्यासाठी गुळांबा करता येतो. यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो.
छुंदा हे कैरीच्या एका पदार्थाचं भारीच गोड नाव.. दिसायला तो साखरआंबा किंवा गुळांबा यांच्यासारखा असला तरी चवीला मात्र खूपच वेगळा असतो.
याशिवाय या दिवसांत कैरी घालूनही आमटी किंवा वरण केलं जातं. आंबट- गोड- तिखट चवीची आमटी भातासोबत छान लागते, शिवाय तिच्यामध्ये पोळी कुस्करूनही भरपेट जेवता येते..
कैरीचा भात सुद्धा अनेक ठिकाणी केला जातो. भातप्रेमींसाठी हा पदार्थ म्हणजे उन्हाळ्यातली पर्वणी असतो...
याशिवाय कैरी, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर घालून केलेला कैरीचा ठेचाही अतिशय चवदार लागतो.