Join us

Summer Special : उन्हाळ्यात महाराष्ट्रीयन कोशिंबीरीची चव काही खास, पाहा कोशिंबीरीचे ८ आंबटगोड प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 18:05 IST

1 / 9
उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सतत तहान लागते. यावेळी आपल्याला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी असणारे पदार्थ खातो. (Koshimbir recipe)
2 / 9
या काळात आपल्याला खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. हलके अन्न खायला सर्वांना आवडते. त्यासाठी आम्ही अशा काही खास कोशिंबीरीचे प्रकार सांगत आहोत ज्यामुळे ताट सुंदर तर दिसेल पण शरीराला थंडावा देखील मिळेल. ( Traditional Koshimbir salad recipe)
3 / 9
हिरव्या काकडीची कोशिंबीर ही आपल्या जेवणाची चव वाढवू शकते. यामध्ये आपण दाण्याचा कूट, लिंबाचा रस-साखर घालू शकतो. (Koshimbir with cucumber and yogurt)
4 / 9
ताटाच्या डाव्या बाजूला काकडी आणि कैरीची कोशिंबीरही बनवू शकतो. यातील कैरी आणि काकडीचे मिश्रण शरीराला थंडावा देईल.
5 / 9
पोटात पौष्टिक आणि हेल्दी जावे असं वाटत असेल तर मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर बनवू शकता. यामध्ये गाजर, काकडी, टोमॅटोही घालता येईल.
6 / 9
दही-काकडी-टोमॅटो शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहे. उन्हाळ्यात याची कोशिंबीर हमखास खायला हवे.
7 / 9
तडकावाली थंडगार कोशिंबीरमध्ये आपण दही-काकडीला वरुन जिरे, मीठ आणि मिरचीची फोडणी देऊ शकतो.
8 / 9
उन्हाचा अधिक त्रास होऊ नये यासाठी आपण कांदा-काकडी आणि दह्याचे मिश्रण करुन त्याची कोशिंबीर बनवू शकतो.
9 / 9
मुलं जर बीट-गाजर खायला नाटक करत असतील तर आपण बीटाची कोशिंबीर देखील ट्राय करु शकतो. यात असणारे घटक उन्हापासून आपले रक्षण करतात.
टॅग्स : अन्नपाककृती