उन्हाळ्यात दूध लगेच नासतं? दूध तापवताना-फ्रिजमध्ये ठेवताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक,दूध नासणार नाही
Updated:March 16, 2026 12:51 IST2026-03-16T08:40:51+5:302026-03-16T12:51:20+5:30
Simple Trick To Prevent Milk Spoiling In The Summer : दूध नेहमी फ्रिजच्या खालच्या कप्प्यात किंवा मधल्या भागात ठेवा. जिथे तापमान स्थिर असते.

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्यामुळे दूध लवकर खराब होण्याची किंवा नासण्याची भिती असते. दूध टिकवून ठेवण्यासाठी आणि ताजे राहण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्स वापरू शकता. (Simple Trick To Prevent Milk Spoiling In The Summer)
दूध डेअरीतून किंवा दूधवाल्याकडून आणल्यावर ते जास्तवेळ तसंच बाहेर ठेवू नका दूध लगचेचं उकळवायला ठेवा. (Simple Trick To Keep Milk Fresh In The Summer)
जर तुम्हाला वाटत असेल की दूध आता खराब होऊ शकते किंवा हवामान खूपच गरम आहे तर दूध उकळताना त्यात अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घाला. यामुळे दूध फाटण्याची शक्यता कमी होते.
गरम दूध कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे फ्रिजचे तापमान तर बिघडतेच पण दूधही लवकर खराब होऊ शकतं. दूध आधी रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच फ्रिजमध्ये ठेवा.
दूध नेहमी फ्रिजच्या खालच्या कप्प्यात किंवा मधल्या भागात ठेवा. जिथे तापमान स्थिर असते.
दूध फक्त सकाळीच नाही तर रात्री एकदा उकळवून पूर्ण थंड करून फ्रिजमध्ये ठेवा. ज्या भांड्यात तुम्ही दूध उकळवणार किंवा साठवणार आहात ते भांडं पूर्णपणे स्वच्छ असावं.
जर फ्रिज बंद असेल तर मोठ्या परातीत थंड पाणी प्या आणइ त्यात दुधाचे भांडे ठेवा. त्यावर सुती ओले कापड झाकून ठेवल्यानंतर दूध काही काळ टिकू शकते.