न लाटता झटपट पराठे करण्याची भन्नाट ट्रिक- चवीला मस्त आणि करायला एकदम सोपे
Updated:October 4, 2025 15:28 IST2025-10-04T15:21:24+5:302025-10-04T15:28:40+5:30

पराठे हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. मग ते पराठे बटाट्याचे असो किंवा वेगवेगळ्या भाज्या किसून केलेले असो. लहान मुलांनाही ते विशेष आवडतात.
आता पराठे करण्याची एक वेगळी रेसिपी पाहा. या रेसिपीनुसार पराठे करताना तुम्हाला ते पोळपाट लाटणं घेऊन लाटत बसण्याची अजिबातच गरज नाही.
शिवाय पराठे करण्यासाठी कणिक मळत बसण्याचीही गरज नाही.
हे पराठे करण्यासाठी एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये तुम्ही थोडे ज्वारीचे पीठ आणि बेसनही घालू शकता.
आता या पिठामध्ये किसलेल्या भाज्या, किसलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण- मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, मसाले असं सगळं घाला आणि पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्या.
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्या आणि डोसा करतो त्याप्रमाणे तव्यावर पीठ टाका. तवा हलवून हे पीठ सगळीकडे पसरवून घ्या. डोसा करताना करतो त्याप्रमाणे पळी किंवा वाटी लावून ते पीठ पसरवू नका.
यानंतर एक बाजू पुर्णपणे भाजली गेली की पराठा उलटवून टाका आणि दोन्ही बाजुंनी खमंग भाजून घ्या. भाजताना त्याला थोडे बटर किंवा तूप लावले तरी चालेल.