1 / 6श्रावण सुरु झाला की, अनेक सणांची आणि प्रातांनुसार पदार्थांची रेलचेल पाहायला मिळतात. श्रावणातला पहिला आणि मुख्य सण अर्थात नागपंचमी. या दिवशी शंकरासह नागाची पूजा केली जाते. नागोबाला प्रसन्न करण्यासाठी विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात. (nagpanchami prasadam items)2 / 6महाराष्ट्रसह अनेक भागांमध्ये नागपंचमीचा सण साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवशी नागोबाला नैवेद्य म्हणून काय अर्पण केले जाते. (nagpanchami sweets and snacks)3 / 6महाराष्ट्रात नागपंचमीला कढई किंवा तव्याचा वापर करत नाहीत. म्हणून गव्हाची खीर, उकडीचे कानवले, पुरणाचे दिंड असे पारंपरिक पदार्थ केले जातात. 4 / 6राजस्थानमध्ये दाल बाटी चुरमा बनवला जातो. हा पदार्थ प्रामुख्याने तुरीच्या डाळीपासून बनवतात. 5 / 6बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ तयार करतात. या भागात भाजणी आणि कापणीचे पदार्थ करता येत नाही. 6 / 6मध्य प्रदेशात नागपंचमी उत्साहात साजरी करतात. नैवेद्य म्हणून खीर- पुरी केली जाते. तांदळापासून खीर बनवतात तर गव्हाच्या पुऱ्या केल्या जातात.