1 / 7श्रावण महिना हा व्रत-वैकल्यांचा महिना मानला जातो. या काळात अनेक उपवास केले जातात. महिलांवर्गांमध्ये उपवास करण्याची पद्धत जास्त प्रमाणात आहे. परंतु, अनेकदा उपवास केल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. 2 / 7उपवासात सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ साबुदाणा. परंतु, जास्त प्रमाणात खाल्ला तर पोट फुगण्याची, अपचनाची समस्या होते. त्यामुळे साबुदाणा खाणे टाळले जाते. जर यंदा श्रावणात तुम्ही देखील उपवास करत असाल तर साबुदाण्याऐवजी हे ५ पदार्थ खा. 3 / 7श्रावणी सोमवारी भगर किंवा वरई खात नाही असं म्हटलं जातं. अशावेळी आपण राजगिऱ्याचे लाडू, शिंगाड्याचे थालीपीठ, वडे करुन खाऊ शकतो. 4 / 7साबुदाणा खायचा असेल तर आपण दही किंवा ताकासोबत घ्या, ज्यामुळे पचण्यास मदत होते. 5 / 7उपवासात शरीराला ताकद मिळण्यासाठी आपण खजूर, राजगिऱ्याचे पदार्थ, सुकामेवा, शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की खाऊ शकतो. 6 / 7फळांमध्ये आपण केळी, संत्री, मोसंबी किंवा मौसमी फळे खाऊ शकतो. ज्यामुळे पोट भरलेले राहिल आणि आरोग्य सुधारेल. 7 / 7चहा-कॉफीऐवजी आपण दूध, नारळ पाणी किंवा ताज्या फळांचा ज्यूस पिऊ शकतो. ज्यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता कमी होईल.