लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

Updated:April 13, 2025 18:40 IST2025-04-13T18:08:46+5:302025-04-13T18:40:21+5:30

see which types of pickle are popular in Maharashtra : एकाच चवीचे लोणचे खाऊ नका. पाहा किती प्रकार आहेत लोणच्यामध्ये.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

भारतात प्रत्येक राज्यामध्ये लोणचे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास वर्षभरासाठी हे साठवणीचे पदार्थ केले जातात. तसेच आंबा- कैरी या सिझनमध्ये येतात.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

भारतामध्ये राज्याराज्यातून तर सोडाच घराघरातून लोणचे करायची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची स्वतःची एक खासियत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या हातचे लोणचे चवीला वेगळे लागते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

विकत विविध प्रकारची लोणची मिळतात. चांगल्या मोठ्या ब्रॅण्डची ही लोणची घरी केलेल्या लोणच्यांसमोर मात्र फिकीच. अनेक प्रकारची लोणची घरी करता येतात. पाहा महाराष्ट्रामध्ये कोणती लोणची लोकप्रिय आहेत.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

कैरीचे लोणचे हे सगळ्यांनाच फार आवडते. काही जण हे लोणचं वाटून करतात. तर काहींना फेसलेले आवडते. काहींना फोडींचे आवडते तर काहींना किसलेले. भारतभरात हे लोणचे केले जाते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

आवळ्याचे लोणचे चवीला फार सुंदर लागते. पौष्टिकही असते. हे लोणचे करायची पद्धत वेगवेगळी असली तरी छान मोहरीची फोडणी देऊनच केले जाते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

लसणाचे लोणचे चवीला फार छान लागते. फार लोकांना हा प्रकार माहितीचा नाही. करायला अगदीच सोपा आहे. भाताबरोबर मस्त लागते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

मिक्स भाज्यांचे लोणचे हॉटेलमध्ये मिळते. ते घरी करायलाही फार सोपे असते. छान ताजी गाजरे वापरली तसेच मटारही छान ताजे वापरले की भाज्यांचे लोणचे मस्त झालेच म्हणून समजा.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

काहींना तिखट पदार्थ फार आवडतात. अशा लोकांसाठी खास मिरचीचे लोणचे केले जाते. चवीला मस्त झणझणीत असते. दह्यात कालवूनही खाल्ले जाते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

बडीशेप आपण जेवणानंतर खातो. मात्र जेवताना ताटात बडीशेपेचे लोणचे असेल तर मग और क्या चाहिए. चवीला फार रुचकर व चमचमीत असे हे लोणचे मस्त लालचुटूक असते.

लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

करवंदाचे फळ चवीला जेवढे छान तेवढेच त्याचे लोणचेही. उन्हाळ्यामध्ये खास हा प्रकार करायलाच हवा. ताजी करवंदे या सिझनमध्ये येतात. त्याचे हे लोणचे करा. फारच सोपे असते.