संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवास सोडताना नैवैद्य दाखवण्यासाठी करा झटपट ५ गोड पदार्थ, कष्ट कमी-चव जबरदस्त
Updated:May 16, 2025 15:09 IST2025-05-16T15:04:16+5:302025-05-16T15:09:23+5:30
Sankashti Chaturthi Special: Make 5 quick sweet dishes : उपवास सोडताना करा हे गोड पदार्थ अगदी झटपट. नैवेद्यासाठी खास यादी.

चतुर्थीला उपास ठेवल्यानंतर संध्याकाळी उपास सोडताना देवाला नैवेद्य दाखवला जातो. काही जण उपासाचा फराळ पोटभर करतात. मात्र काही जण दिवसभर फक्त फळांवरही राहतात. काही तर कडक उपवास करणारेही असतात जे पाण्यावर राहतात.
उपवास सोडताना जो नैवेद्य दाखवला जातो. त्यात छान विविध प्रकारचे पदार्थ असतात. वरण भात भाजी पोळी किंवा पुरी तर असतेच मात्र एक गोडाचा पदार्थ तर ताटात असायलाच हवा. नैवेद्यासाठी अगदी झटपट करता येणारे पदार्थ पाहा.
चतुर्थीचा उपवास हा गणपती बाप्पासाठी ठेवला जातो. त्यामुळे उपवास सोडताना मोदक केले जातात. उकडीचे मोदक नाही तर मग तळणीचे मोदक केले जातात. मात्र मोदक करायला वेळ नसेल तर इतरही पदार्थ केलेले चालते.
अगदी झटपट करता येईल असा घरोघरी केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा. रवा परतला पाणी तापवले की झाले अगदी लगेच हा पदार्थ करता येतो.
आणखी एक गोडाचा कॉमन पदार्थ म्हणजे शेवयांची खीर. अगदी पटकन करता येणारी ही खीर चवीला फार सुंदर असते. प्रसादासाठी खीर करा सगळ्यांना नक्कीच आवडेल.
खीरीचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक मस्त प्रकार म्हणजे साबुदाण्याची खीर. करायला अगदीच सोपी असते. साबुदाणा भिजत घालायला जर वेळ नसेल तर उकडून घेतला तरी चालतो. साखर घाला किंवा गूळ चव मस्तच असते.
अगदी पटकन करता येईल असा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. अगदी कमी सामग्रीत करता येतो आणि तांदूळ व दूध उकळायला जो काही वेळ लागेल तेवढाच बाकी काही वेळ लागत नाही.
गाजराचा हलवाही झटपट करता येतो. गाजर वाफवूनही हलवा करता येतो. तसेच किसलेले गाजर परतून करता येतो. नैवेद्यासाठी हलवा केला तर सगळेच फार आवडीने खातील एवढे मात्र नक्की.