प्रजासत्ताक दिन: ३ रंग वापरून केलेल्या ९ 'तिरंगा रेसिपी', बघा तुम्हाला कोणता पदार्थ आवडला
Updated:January 25, 2024 16:36 IST2024-01-25T16:30:47+5:302024-01-25T16:36:26+5:30

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जसा सगळीकडे दिसतो आहे, तसाच तो तुमच्या स्वयंपाक घरातही दिसून येऊ द्या... आपल्या तिरंग्याचे ३ रंग वापरून खूप छान रेसिपी करता येतात. बघा या रेसिपी कोणत्या आहेत आणि ठरवून टाका तुम्ही यातली नेमकी कोणती रेसिपी ट्राय करणार आहात....
सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी ही तिरंगा खीर रेसिपी त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यांच्या यु ट्यूब किंवा इन्स्टाग्राम चॅनलवर ही रेसिपी नक्की पाहता येईल.
इडलीच्या पिठाचे ३ हिस्से करून त्यात वेगवेगळे फूड कलर टाकून अशी तिरंगा इडली करणंही सोपं आहे.
इडली प्रमाणेच असे तिरंगा डोसेही करता येतील. फक्त ते खूप काळजीपुर्वक करावे लागतील.(image credit- google))
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही असे तिरंगा ढोकळेही करू शकता.
असा केकही तुम्हाला करता येईल. किंवा असं तिरंगा आयसिंग न करता केकच्या बॅटरचे ३ हिस्से करा. त्यात तिरंग्याचे ३ रंग टाका आणि एकानंतर एक ते बॅटर सेट करा. अशा पद्धतीनेही तिरंगा केक करता येईल.
नारळाच्या बर्फीलाही असं तिरंग्याच्या रंगात रंगवता येईल.
तिरंगा सॅण्डविच हा तर अनेक जणांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ आहे.
अशा पद्धतीचं तिरंगा स्टाईल सलाड डेकोरेशनही करता येईल.