रामनवमी २०२५ : रामरायाच्या नैवेद्यासाठी करा खास ५ पदार्थ, पारंपरिक आणि चविष्ट!
Updated:April 5, 2025 18:30 IST2025-04-05T09:20:10+5:302025-04-05T18:30:07+5:30

रामनवमीनिमित्त श्रीरामाला नैवेद्या दाखविण्यासाठी कोणता गोड पदार्थ करावा असा प्रश्न पडला असेल तर हे काही पर्याय पाहा.. हे पदार्थ करायला सोपे आहेत आणि शिवाय खूप झटपट होतात.
पंजिरी हा पदार्थ रामनवमीनिमित्त बहुतांश ठिकाणी केला जातो. या पदार्थाला राम नवमीच्या दिवशी खूप महत्त्व असते. गव्हाचे पीठ, सुकामेवा, साजुक तूप, मखाना असे पदार्थ वापरून पंजिरी करता येते.
बेसन लाडू हा पदार्थही तुम्ही राम नवमीच्या प्रसादासाठी करू शकता.
बदाम, काजू, पिस्ते, खजूर, खारीक, खोबरं असा सगळा सुकामेवा घालून त्याचेही लाडू करून तुम्ही श्रीरामाला नैवेद्य दाखवू शकता.
याशिवाय श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थही तुम्ही रामनवमीच्या दिवशी प्रसाद म्हणून करू शकता.
साजुक तुपातला शिरा हा देखील रामनवमीच्या प्रसादासाठी एक उत्तम पदार्थ ठरू शकतो.