राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

Updated:April 5, 2025 18:15 IST2025-04-05T15:39:05+5:302025-04-05T18:15:02+5:30

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

राम नवमी, कृष्ण जन्माष्टमी अशा उत्सवाच्या प्रसंगी देवासाठी पंजिरीचा नैवेद्य हमखास केला जातो. आता रामनवमीनिमित्त पंजिरी करण्याची तयारी घरोघरी सुरू आहेच.. त्यामुळेच ही रेसिपी पाहा आणि अगदी झटपट चवदार पंजिरी तयार करा.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

पंजिरीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी धने पंजिरी कशी करायची ते आता आपण पाहूया..

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

यासाठी सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये पाव कप खोबऱ्याचा किस घालून मंद आचेवर भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचा किस कढईतून काढून घ्या.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घाला आणि अर्धा कप मखाने परतून घ्या.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

मखाने परतून झाल्यानंतर साधारण अर्धा कप होतील एवढे सुकामेव्याचे तुकडेही मंद आचेवर परतून घ्या.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

सगळ्यात शेवटी पाव कप धणे पावडर कढईमध्ये टाकून ती थोडी गरम करून घ्या.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर घाला आणि वेलची पूड घाला.

राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले की झाली पंजिरी तयार. काही ठिकाणी हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून ते जाडेभरडे फिरवूनही घेतले जातात. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पंजिरी करू शकता.