१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Updated:August 9, 2025 18:46 IST2025-08-09T18:34:55+5:302025-08-09T18:46:41+5:30

१५ दिवस चहा सोडला तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? हे कठीण वाटतं, पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हे चॅलेंज नक्कीच स्वीकारण्याचा निर्णय घ्याल.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सकाळची सुरुवात अनेकदा एक कप चहाने होते, काहींना दिवसातून ४ कप चहा पिण्याची सवय असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही फक्त १५ दिवस चहा सोडला तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? हे कठीण वाटतं, पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हे चॅलेंज नक्कीच स्वीकारण्याचा निर्णय घ्याल.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

डॉ. नवनीत कालरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा सोडणं हे शरीरासाठी एक प्रकारचे डिटॉक्स आहे, ज्यामुळे अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

चहामध्ये असलेले कॅफिन तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करतं. सतत चहा प्यायल्याने तुम्हाला उशीरा झोप येते आणि चांगली झोप लागत नाही. पण जेव्हा तुम्ही १५ दिवस चहा सोडता तेव्हा कॅफिनचा प्रभाव कमी होतो आणि झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कॅफिन हे शरीरातील पाणी वेगाने काढून टाकतं. जास्त चहा प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे थकवा येतो आणि त्वचा कोरडी होते. चहा सोडल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन अबाधित राहतं आणि त्वचा देखील निरोगी दिसू लागते.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

जास्त चहा प्यायल्याने कधीकधी एसिडिटी, गॅस आणि पोटफुगीची समस्या वाढते. चहा सोडल्याने पोटाचं पीएच संतुलन सुधारतं, पचन चांगले होतं आणि अन्न सहज पचू लागतं.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

चहामध्ये असलेल्या कॅफिनपासून मिळणारी ऊर्जा तात्पुरती असते, त्यानंतर थकवा आणि सुस्ती जाणवते. परंतु १५ दिवस चहा सोडल्यानंतर, तुमचे शरीर कॅफिनशिवायही पुरेशी ऊर्जा निर्माण करू लागतं, ज्यामुळे तुम्ही दिवसभर एक्टिव्ह राहता.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

चहामध्ये असलेले टॅनिन आणि कॅफिन शरीरातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स कमी करू शकतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि केस कमकुवत होतात. जेव्हा तुम्ही चहा सोडता तेव्हा शरीराला चांगलं पोषण मिळते आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते.

१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तुम्ही सकाळच्या चहाऐवजी हर्बल टी, लिंबूपाणी किंवा ग्रीन स्मूदी घ्या. कॅफिनच्या कमतरतेमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या. साखर आणि प्रक्रिया केलेलं अन्न कमी करा जेणेकरून शरीर लवकर डिटॉक्स करू शकेल.