५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

Updated:January 9, 2026 18:26 IST2026-01-08T09:32:26+5:302026-01-09T18:26:48+5:30

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

ओली हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. ती जर आपण नियमितपणे खाल्ली तर पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही उपयुक्त ठरते.

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

याशिवाय ओल्या हळदीमध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटकांमुळे त्वचेच्याही अनेक तक्रारी दूर होतात. त्यामुळे त्वचा नितळ, सुंदर होते. हिवाळ्यात तर ओली हळद खाणं खूप फायदेशीर मानलं जातं.

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

आता ओली हळद खाण्याचा एक चटपटीत मार्ग म्हणजे तिचं इंस्टंट लोणचं करणे आणि ते खाणे (olya haldicha loncha). लोणचं करण्याची रेसिपी अतिशय सोपी असून हे लोणचं खूप चवदार होतं. तसेच ८ ते १० दिवस चांगलं टिकतं.(Fresh Turmeric Pickle recipe)

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

त्यासाठी ओली हळद स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्या. यानंतर तिचे अगदी बारीक बारीक काप करा.

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

आता एका भांड्यात ओल्या हळदीचे काप टाकल्यानंतर त्यामध्ये बाजारात विकत मिळणारा लोणचं मसाला, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार लाल तिखट, मीठ घाला.

५ मिनिटांत करा ओल्या हळदीचं लोणचं! पचन चांगलं होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरपूर

यानंतर त्यामध्ये लोणच्याच्या प्रमाणानुसार लिंबाचा ताजा रस घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं झालं तयार..