न लाटता, न कणीक मळता चपात्या करण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत होतील ५० मऊसूत चपात्या
Updated:October 17, 2025 11:15 IST2025-10-17T11:02:51+5:302025-10-17T11:15:57+5:30
No Rolling No Kneading Chapati Making Hacks : या पद्धतीनं चपात्या केल्यास तुमचा बराचवेळ वाचेल.

न लाटता चपाती करण्याची पद्धत सध्या बरीच व्हायरल होत आहे. या पद्धतीनं मळण्याची किंवा लाटण्याची आवश्यकता नसते. काही खास टिप्स फॉलो करून तुम्ही सोप्या पद्धतीनं ही चपाती बनवू शकता. (10 Mins Chapati Making Recipe)
साधारण १ कप गव्हाचं पीठ आणि दीड ते २ कप पाणी घ्या.चवीनुसार मीठ आणि १ चमचा तेल किंवा तूप पिठात मिसळा. यामुळे चपाती मऊ आणि अधिक चवदार बनते. (No Rolling No Kneading Chapati Making Hacks)
एका मोठ्या भांड्यात कणीक घ्या. त्यात मीठ आणि तेल घाला. पाणी हळूहळू घाला आणि मिश्रणात गुठळ्या होऊ न देता चांगले फेटून घ्या.
मिश्रण डोश्याच्या पिठापेक्षा थोडं पातळ आणि भजीच्या पिठापेक्षा थोडं जाडसर ठेवा. जे पॅनवर सहज पसरायला हवं इतकं पातळ ठेवा.
तयार केलेल्या पातळ मिश्रणाला १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे चपाती अधिकच मऊ होण्यास मदत होईल.मध्यम आचेवर नॉनस्टिक तवा गरम करा. तव्याला थोडं तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या.
एक मोठा चमचा किंवा छोट्या वाटीत मिश्रण घ्या. गरम तव्याच्या मध्यभागी हे मिश्रण ओता आणि चमच्याच्या मदतीनं हलक्या हातानं गोलाकारात पसरवा.
गॅसची आच मंद ते मध्यम ठेवा. वरची बाजू कोरडी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यावर लहान लहान बुडबुडे दिसून येतील. वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर चपाती हलक्या हातानं उलटवून घ्या.
दुसऱ्या बाजूला १ मिनिटं भाजा. चपाती पुन्हा उलटवून घ्या. चपातीला थेट गॅसच्या आचेवर ठेवून किंवा तव्यावर उलथण्याच्या मदतीनं हलकं दाबून फुगवून घ्या.
नॉनस्टिक तव्यावर भाजल्यास चपातीला हलकं दाबून पूर्ण शिजवा.या पद्धतीमुळे वेळेची बचत होते. घाईच्यावेळी पटकन चपात्या करता येतात. लाटण्यामुळे होणारा श्रम टाळता येतो. योग्य प्रमाणात मिश्रण तयार केल्यास चपात्या मऊ होतात.