Navratri colours 2025 : हिरवे हिरवे ८ पदार्थ पोटासाठी वरदान! जिभेचे चोचले पुरवणारा सुंदर आहार
Updated:September 26, 2025 13:29 IST2025-09-26T13:23:05+5:302025-09-26T13:29:14+5:30
Navratri colours 2025: 8 green foods are a boon for the stomach! A beautiful diet that will satisfy your hunger : हिरव्या रंगाचे पदार्थ म्हणजे पोषण आणि चवीचे मस्त कॉम्बिनेशन.

नवरात्रीच्या ५व्या दिवसाचा रंग हिरवा आहे. देवीला हिरव्या रंगाची साडी फारच सुंदर दिसते. फक्त नवरात्रीतच नाही तर इतरही दिवशी देवीला हिरव्या बांगड्या, हिरवी साडी चढवली जाते. हिरवा रंग आहारात असणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते.
हिरव्या भाज्या, फळे आरोग्यासाठी वरदान आहेत. त्यात भरपूर पोषण असते. एवढेच नाही तर हिरवळीकडे पाहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायद्याचे ठरते. हिरव्या रंगाचे पदार्थ आहारात रोज असायला हवे.
पालक पनीर ही फार लोकप्रिय अशी भाजी आहे. हिरवागार पालक मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करायची. त्यात मसाले, पनीरचे तुकडे, साय असे विविध पदार्थ घालायचे. ही भाजी फारच चविष्ट असते.
आरोग्यासाठी फार पौष्टिक ठरणारे कोथिंबीरीचे सूप नक्की प्या. हे सूप पोषण तर देतेच शिवाय चवही एकदम मस्त असते. करायला अगदी सोपे आहे. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काही साधे मसाले वापरुन मस्त सूप करता येते.
डोसा आवडतो का ? मग हिरव्या मुगाचा डोसा नक्की खाऊन पाहा. करायला अगदीच सोपा असलेला हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. तसेच लहान मुले आवडीने खातात. सोबत छान आवडती चटणी करायची.
हिवाळ्यात फार आवडीने घरोघरी केले जाणारे मटार पराठे म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एकदम मस्त उपाय. मटार, लसूण, कांदा असे पदार्थ घेऊन छान सारण तयार करायचे. गव्हाच्या पिठाच्या लाट्या लाटून त्यात भरायचे. आणि छान परतून घ्यायचे.
फक्त साधी परतून केलेली भेंडीची भाजी लहान मुलांच्या फार आवडीची असते. छान कुरकुरीत अशी भाजी परतायची. गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत मस्त लागते. तसेच पौष्टिकही असते.
भारतात विविध प्रकारच्या खिचडी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पालक खिचडी. त्यात पालकाची पेस्ट, कांदा, कोथिंबीर आणि इतरही अनेक पदार्थ घातले जातात. पौष्टिक आणि एकदम स्वादिष्ट अशी ही खिचडी नक्की करा.
वजन कमी करण्यासाठी तसेच पौष्टिक आहार घ्यायचा असेल तर आहारात हिरवे सॅलेड असायलाच हवे. काकडी, कोबी, कोथिंबीर, हिरवी चटणी अशा पदार्थांचे मिश्रण करुन तयार केलेले हे सॅलेड आरोग्यासाठी पोषक ठरते.
जेवणानंतर आवडीने खाल्ले जाणारे पानसुद्धा रंगाला हिरवेच. त्यात विविध पदार्थ भरुन मग मसाला पान तयार केले जाते. विड्याचे पान नुसते खाणे आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते.