Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

Updated:September 23, 2025 15:54 IST2025-09-23T15:47:21+5:302025-09-23T15:54:08+5:30

Navratri 2025: Today's color is red - 7 sparkling, spicy red foods, will increase the flavor of life : असे लाल पदार्थ नक्की खाऊन पाहा.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

नवरात्रीच्या दुसर्‍या दिवसाचा रंग म्हणजे लाल. लाल रंगाचे कपडे जसे सुंदर दिसतात तसेच लाल रंगाचे पदार्थ ही चवीला जबरदस्त असतात. खास झणझणीत पदार्थ रंगाला छान लाल असतात. तसेच चवीला चमचमीत असतात.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

घरोघरी केला जाणारा भाताचा प्रकार म्हणजे टोमॅटो भात. करायला अगदी सोपा असतो आणि चवीला एकदम भारी. झणझणीत असा हा पदार्थ नाश्त्यासाठीही खाता येतो तसेच जेवणासाठीही करता येतो.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

महाराष्ट्रात घरोघरी लसणाची चटणी असतेच. विकतची नाही तर खास घरीच केलेली असते. भातासोबत , चपातीसोबत आवडीने खाल्ली जाते. मात्र भाकरी आणि लसणाची चटणी म्हणजे काही औरच कॉम्बिनेशन आहे.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरमागरम टोमॅटो सूप मिळाले की मजाच येते. चवीला छान आणि मुख्य म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा असा हा पदार्थ आहे. तसेच पौष्टिकही असते.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

कोणतीही भाजी असो ती लाल मसाल्यात म्हणजेच लाल रस्स्यात करता येते. फोडणीत मस्त तिखट घातले तसेच टोमॅटोची पेस्ट घातली की मस्त असा रस्सा तयार होतो. सगळ्यांनाच आवडतो.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

सुक्या लाल मिरचीचा ठेचा काश्मीरी लाल मिरचीपासून केला जातो. रंगाला एकदम लालेलाल आणि खाताना डोळ्यातून पाणी काढणारा हा पदार्थ महाराष्ट्रात गावोगावी फार आवडीने खाल्ला जातो. भाकरी आणि ठेचा एवढेच अनेकांचे रोजचे जेवणही असते.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

आत्ताच्या पिढीतील मुलांना फार आवडणारा पदार्थ म्हणजे पास्ता. यातही एक प्रकार असतो ज्याला रेड पास्ता अस नाव आहे. लाल रंगाचा हा पास्ता एकदम चीजी तर असतोच मात्र चवीलाही एकदम मस्त असतो. तरुणपिढी फार आवडीने हा पदार्थ खाते.

Navratri 2025 : आजचा रंग लाल- चमचमीत चटकदार आणि झणझणीत ७ लाल पदार्थ, जगण्याची वाढेल लाली

लाल रंगाचा राजमा मसाला भारतात फार लोकप्रिय आहे. राजमा आहारात असावा. तसेच राजमा चवीलाही एकदम मस्त असतो. लहान मुलांनाही ही रेसिपी फार आवडते.