1 / 10उन्हाळा म्हटलं की सगळ्यांत आधी आपल्याला (Best Famous Mango Varieties in India) आंब्याचा सिझन आठवतो. वर्षातून अवघे ३ ते ४ महिने खाता येणारा हा फळांचा राजा म्हणजे सगळ्यांचे पहिले प्रेम. खरंतर, आंब्याचे वेगवेगळे प्रकार भारतातील वेगवेगळ्या राज्यांत पिकवले जातात. 2 / 10या पिवळ्याधमक आंब्याचे वेगवेगळे प्रकार आणि ते भारतातील ( Best Famous Mango Varieties in India) कोणकोणत्या राज्यांत पिकवले जातात, तसेच कोणत्या हंगामात त्यांची चव चाखता येते ते पाहूयात. 3 / 10१. भारतातील महाराष्ट्र राज्यांतील वेगवेगळ्या भागात हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. आंब्याच्या वेगवेगळ्या जातींपैकी हापूस आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. एप्रिल ते जून महिन्यांत हा आंबा फार मोठया प्रमाणावर विकला जातो. तसेच पायरी आंबा देखील फार लोकप्रिय आहे, मे ते जून महिन्याच्या सुरुवातील या आंब्याची गोड चव चाखता येते. 4 / 10२. गुजरात राज्यांत मे ते जुलै महिन्यांत गीर केसर हा आंब्याचा प्रकार फार मोठया प्रमाणावर खाल्ला जातो. तसेच एप्रिल ते जून महिन्यात राजापुरी आंब्याला फार मोठ्या प्रमाणांत मागणी असते. 5 / 10३. उत्तर प्रदेशचा दशहरी आणि लंगरा या दोन्ही आंब्याच्या जाती अगदी देशभरात लोकप्रिय आहे. दशहरी जून ते जुलै तर लंगरा जून महिन्याच्या शेवटापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या काळात या आंब्याची चव चाखता येते. 6 / 10४. वेस्ट बंगाल भागातील हिमसागर आणि फझली या दोन्ही प्रकारच्या आंब्याची चव अगदी सुरेख असते. मे ते जून महिन्यांत हिमसागर तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात फझली आंब्याची चव चाखता येते. 7 / 10५. बैंगनपल्ली आणि सुवर्णरेखा या आंब्याच्या दोन्ही जाती अतिशय लोकप्रिय आहे. मे ते जून महिना या सिझनमध्ये आंब्याच्या या दोन्ही प्रकारची चव चाखता येते. 8 / 10६. तामिळनाडूचा हिमायत आणि मालगोवा अशा आंब्याच्या दोन जाती फारच लोकप्रिय आहेत. मे ते जून महिन्यात हिमायत तर जून ते जुलै महिन्यात मालगोवा आंबा फार मोठ्या प्रमाणांत खाल्ला जातो. 9 / 10७. कर्नाटकची खासियत असलेला रसपुरी आणि बदामी अशा आंब्याच्या दोन्ही जाती चवीला खूपच खास आहेत. एप्रिल ते जून महिन्यात आंब्याचे हे दोन्ही प्रकार कर्नाटकसहित संपूर्ण देशभरात खाल्ले जातात. 10 / 10८. केरळमध्ये मोवंडंन आणि किलीचुंडन असे आंब्याचे दोन्ही प्रकार अतिशय लोकप्रिय आहेत. जून ते ऑगस्ट महिन्यांत मोवंडंन तर मे ते जुलै महिन्यांत किलीचुंडन अशा दोन्ही प्रकारच्या आंब्याची चव चाखता येते.