Join us

पाणीपुरीच्या पाण्याचे ७ आंबटगोड प्रकार! उन्हाळ्यात करा ७ फ्लेवर पाणीपुरी- कितीही खा पोट भरणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 17:51 IST

1 / 9
पाणीपुरी म्हणजे अत्यंत आवडता विषय. डाएट किंवा मग वजनाची चिंता बाजूला ठेऊन मनसोक्त हा पदार्थ आपण खातो. चमचमीत तिखट, आंबट, गोड सगळ्याच चवी या पदार्थामध्ये असतात.
2 / 9
पाणीपुरीचे पाणी करायला अगदीच सोपे असते. पण तुम्हाला माहिती आहे का? पाणीपुरीच्या पाण्यामध्ये फक्त पुदिन्याचे पाणी आणि चिंचेचे पाणी एवढेच प्रकार नसतात. इतरही अनेक प्रकार असतात. सगळेच करायला सोपे आहेत.
3 / 9
रजवाडी हा पाणीपुरीच्या पाण्याचा प्रकार चवीला जरा गोडसर असतो. तसेच त्यामध्ये दही घातलेले असते. रंगाला पोपटी असे हे पाणी फारच चवीष्ट लागते.
4 / 9
हजमा-हजम नावाचा एक प्रकार आजकाल फार लोकप्रिय आहे. त्यामध्ये चिंच, गूळ तसेच चाट मसाला आणि हजमोलाचा फ्लेवर असतो. चवीला हे पाणी आंबट गोड असे असते.
5 / 9
पुदिन्याचे पाणी तुम्ही नक्कीच प्यायले असेल. कोथिंबीर, मिरची, आलं आणि पुदिना असे मिश्रण असलेले हे पाणी बुंदी घालून छान लागते.
6 / 9
सध्या लसूण पाणी हा फ्लेवरही फार लोकप्रिय आहे. लसणाची झणझणीत चव या पाण्याला असते. जिभेला ते पाणी जरा चरचरते. पण तरी मस्तच लागते.
7 / 9
लिंबू पाणी हा अत्यंत सोपा आणि साधा प्रकार आहे. पाणी दिसायलाही पांढरेच असते. पाण्यामध्ये भरपूर लिंबू पिळायचे. त्यामध्ये थोडा सोडा घालायचा आणि चाट मसाला घालायचा.
8 / 9
जिऱ्याचे पाणी हा ही एक प्रकार यामध्ये आहे. त्यासाठी आमचूर पावडर तसेच जिऱ्याची पूड आणि चिंच वापरलेली असते. त्यामध्ये कोथिंबीरही घालतात.
9 / 9
तुम्ही जलजिरा नक्कीच प्यायला असाल. मस्त चमचमीत आणि आंबट असा जलजिरा वापरूनही पाणी पुरीचे पाणी केले जाते. त्यामध्ये थोडा सोडा घातला जातो.
टॅग्स : अन्नसमर स्पेशलपाककृती