जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

Published:March 11, 2024 05:02 PM2024-03-11T17:02:19+5:302024-03-11T17:06:35+5:30

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

महाराष्ट्रातल्या स्ट्रिटफूडबाबत आपण जेव्हा बोलतो, तेव्हा वडापावला टाळून पुढे जाताच येत नाही. खरोखर लागलेली भूक असो, छोटीशी भूक असो किंवा मग टाईमपास म्हणून काहीतरी खायचं असो... स्वस्तात मस्तं आणि खमंग- चवदार पदार्थ म्हणजे वडापाव.

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

वडापावची लोकप्रियता आता थेट जगभरातच पोहोचली आहे. म्हणूनच तर tasteatlas यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये आपल्या मराठमोळ्या वडापावने बाजी मारली आहे.

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

tasteatlas यांनी जगभरातील प्रसिद्ध सॅण्डविचची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये जगभरात वेगवेगळ्या प्रांतात मिळणाऱ्या ५० प्रसिद्ध सॅण्डविचचा समावेश आहे. या यादीमध्ये १९ व्या स्थानावर वडापावचा उल्लेख असून त्याला ४. ३ रेटिंग मिळालं आहे.

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

वडापावला अशी जागतिक स्तरावर ओळख मिळणे ही आनंदाचीच बाब आहे. पण तो काही सॅण्डविचचा प्रकार नाही. तो एक वेगळा आणि स्वतंत्र पदार्थ आहे, असं काही खवय्यांचं म्हणणं आहे.

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

तुम्हाला काय वाटतं? वडापावला असं सॅण्डविच म्हणणं योग्य का?