1 / 7माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक केले जातात. बाप्पाला उकडीचे मोदक फार आवडतात. पण अनेकदा मोदकाचे पीठ न जमल्यामुळे ते वळताना तुटतात, कळ्या नीट पडत नाहीत किंवा वाफवल्यानंतर सारण बाहेर येते. (Ukadiche Modak tips)2 / 7आपल्याला कळीदार, पांढरशुभ्र आणि कापसासारखे मऊसुत मोदक बनवायचे असतील, तर तांदळाची पिठी तयार करताना ५ टिप्स लक्षात ठेवा. ( modak recipe)3 / 7उकडीचे मोदक करताना तांदळू हा जुना असावा, आंबेमोहोर घेतल्यास मोदक मऊसूत होतो. तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी निथळून तांदूळ ७ ते ८ तास कोरडा करुन घ्यावा. 4 / 7तांदूळ व्यवस्थित सुकल्यावरच बारीक दळून घ्या. तांदूळ उन्हामध्ये सुकवू नका. तो जास्त कोरडा झाल्यास मोदकाला चिरा पडतात किंवा कळ्या नीट येत नाही. त्यासाठी तांदूळ हा फॅन खाली सुकवावा. 5 / 7उकडीचे पीठ तयार करताना पाणी आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घ्यावे. पाण्यात मीठ आणि तूप घातल्यानंतर चांगली उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर करा. यानंतर त्यात तांदळाचे पीठ घाला. 6 / 7पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करुन १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. पीठ गरम असतानाच १० ते १५ मिनिटे मळून घ्या. 7 / 7पीठ थोडे कोरडे वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात लावून मळा. आणि मग पारी करुन कळीदार, सुबक मोदक तयार करा.