आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

Updated:May 13, 2025 12:17 IST2025-05-13T12:07:26+5:302025-05-13T12:17:17+5:30

Look at not just 1-2 but 8 delicious varieties of Amati and Varan : पाहा आमटी करायच्या पद्धती. वेगवेगळ्या फोडण्या आणि सामग्रीचा वापर करुन आमटीची चव वाढवा.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

भारतात कुठेही जा तुम्हाला वरण भात, डाळ भात, दाल चावल, तडका राईस हे पदार्थ दिसतीलच. करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, मात्र आमटी भात हा प्रकार भारतात आवडीने खाल्ला जातो. थाळी व्हेज असो वा नॉनव्हेज त्यात भात असतोच.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

बरेचदा आपण फक्त आमटी भातही करतो. इतर पदार्थ करायचा घट घालत नाही. मनसोक्त भात खातो. महाराष्ट्रात तर भात मुख्य अन्नाचा भाग आहे. तेच-तेच वरण खाऊन कधीतरी कंटाळा येऊ शकतो. मात्र विविध प्रकारच्या आमटी व वरणाच्या फोडण्या असतात. त्याही नक्की करुन पाहा.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

साधे फोडणीचे वरण अगदी पोटाला आराम देणारे आहे. वरणाला कडीपत्ता, मोहरी, जिरे लसूण, कोथिंबीर अशी फडणी द्यायची. अगदी करायला सोपी आणि चवीला झक्कास.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

कोकणात गरम मसाला आमटी केली जाते. चमचमीत अशी ही आमटी करायला जरा वेळ लागतो. मात्र खाताना जी मज्जा येते ती फक्त अनुभवातूनच कळेल. फोडणीत लाल तिखट घातले जाते. त्याचा तवंग आणि नाकाला झोंबणारी चव या आमटीची खासियत आहे.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

वाटणाचे/वाटपाचे वरण कधी खाल्ले आहे का? कांदा, लसूण, नारणाचे वाटण करुन वरणाला लावायचे. असे वाटण लावलेले वरण अगदी चविष्ट होते. नारळ छान ताजा असेल तर मग खायची मज्जा काही औरच.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

गोड साधी चिंच गुळाची आमटी करायला अगदीच सोपी. त्यात आमसूल घालणे गरजेचे आहे. तसेच नारळ छान लागतो. शेवग्याच्या शेंगा घालून केलेली ही चिंच गुळाची आंबट-गोड आमटी भातावर गरमागरम ओतायची. तुपाची धार त्यावर सोडून मनसोक्त खा.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

मिश्र डाळींचे वरण करुन त्याला फोडणी द्यायची. तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ अशा डाळी समप्रमाणात घ्यायच्या. चणा डाळ जरा कमी घ्यायची. छान शिजवून घ्यायच्या मग त्याला जिरे, मोहरीची फोडणी द्यायची. जिराराईस असेल तर हे फोडणीचे वरण जास्त छान लागते.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

उपासाला केली जाणारी शेंगदाण्यांची आमटी चवीला अगदी कमाल असते. प्रथिनयुक्त अशी ही आमटी म्हणजे शेंगदाणे, कोकम, मसाले, चिंच अशा पदार्थांचे मिश्रण. उपासाला ही आमटी नक्की करुन पाहा.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

पुरणपोळीचा बेत असेल तर नारळाचे दूध हवेच. त्याच बरोबर कटाची आमटी असायलाच हवी. अत्यंत वेगळी अशी ही आमटी करायला सोपी आहे मात्र तयार करायची पद्धत फार भन्नाट आहे. पोळीशी तसेच भाताशी ही आमटी छान लागते. लोक आवडीने वाटी भरून ही आमटी पितात.

आमटी म्हणजे फोडणीची कमाल!! पाहा १-२ नाही तर आमटी आणि वरणाचे चविष्ट ८ प्रकार

विविध प्रकारच्या पालेभाज्या घालून फोडणीचे वरण केले जाते. पालकाचे वरण फार चविष्ट लागते. तसेच माठाचेही वरण केले जाते. मेथीचे वरण फार पौष्टिक असते. इतरही भाज्यांचे फोडणी दिलेले वरण करण्याची पद्धत आहे.