Join us

शिळ्या इडल्यांचे पाहा ८ पदार्थ, खूप इडली उरली तर बिंधास्त करा आणि पोटभर चविष्ट पदार्थ खा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 19:39 IST

1 / 11
मस्त मऊसूत, लुसलुशीत, पांढरीशुभ्र इडली सगळ्यांनाच (idli snacks from leftovers) खायला आवडते. विशेषतः रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी गरमागरम इडल्यांचा बेत केला जातोच. पण कधीकधी इडल्या जास्त बनतात आणि त्या शिल्लक राहतात. दुसऱ्या दिवशी त्या तशाच खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी त्या फेकून देण्याऐवजी किंवा पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने खाण्याऐवजी, तुम्ही त्यापासून काही नवीन आणि चविष्ट पदार्थ तयार करु शकता.
2 / 11
शिल्लक राहिलेल्या इडल्या वापरून तुम्ही एक नाही, तर अनेक वेगवेगळ्या रेसिपीज तयार करू शकता. यामुळे तुमची मेहनत वाचेल आणि घरातल्या सगळ्यांनासुद्धा काहीतरी नवीन खायला मिळेल.
3 / 11
उरलेल्या इडलीचे वेगवेगळे पदार्थ नाश्ता, स्नॅक्स किंवा टी - टाइमला सर्व्ह करण्यासाठीही एकदम बेस्ट आहेत. उरलेल्या इडल्यांचे भन्नाट असे नवीन पदार्थ पाहूयात.
4 / 11
उरलेली इडल्या अर्ध्या कापून बटरमध्ये घालून परतल्यास स्वादिष्ट लागतात. याचबरोबर, त्यांचे छोटे तुकडे करून तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून ढोकळ्या सारखे परतल्यास घरांतील लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ताव मारत हा इडली ढोकळा फस्त करतील.
5 / 11
उरलेल्या इडल्या थोड्या चिरून मग हलकेच हाताने कुस्करुन त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, मसाले घालून आप्पे पॅनमध्ये भाजा. गरमागरम इडली आप्पे चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.
6 / 11
इडलीचा उपमा हा एक खूप सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. यासाठी शिल्लक राहिलेल्या इडल्या हाताने कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घालून परतून घ्या. नंतर कुस्करलेली इडली घालून चांगले मिक्स करा. चवीनुसार मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून परता. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
7 / 11
शिल्लक राहिलेल्या इडल्यांचे तुकडे करून त्यांना सोया सॉस, व्हिनेगर, हिरवी-लाल ढोबळी मिरची, कांदा, सिमला मिरचीसोबत हलकेच तव्यावर परतवून घ्या, इडली चिली खाण्यासाठी तयार आहे.
8 / 11
इडल्यांवर पिझ्झा सॉस, भाज्या, चीज घालून ओव्हनमध्ये बेक करा आणि मस्त गरमागरम इडली पिझ्झा सॉस किंवा पिझ्झा सॉससोबत खाण्यासाठी दिलात तर मुलं अगदी आवडीने सगळं संपवतील.
9 / 11
शिल्लक राहिलेल्या इडल्यांचे लहान तुकडे करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, आणि लाल मिरची घालून फोडणी तयार करा. आता इडलीचे तुकडे घालून ते सोनेरी होईपर्यंत तळा. तुम्ही यामध्ये थोडा सांबार मसाला, चाट मसाला किंवा गोडा मसाला देखील घालू शकता.
10 / 11
चायनीज फूड आवडत असेल तर इडली मंचुरियन नक्की ट्राय करा. इडलीचे लहान चौकोनी तुकडे करून त्यांना कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात घोळवून तळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, आले, कांदा, सिमला मिरची आणि सॉस घालून परता. त्यात तळलेले इडलीचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.
11 / 11
ज्याप्रमाणे बटाट्याचे फ्राईज (fries) बनवतो, त्याचप्रमाणे इडलीचेही फ्राईज बनवता येतात. यासाठी इडल्या लांबट आकारात कापून घ्या. त्यांना थोड्या तेलात तळून कुरकुरीत करा. वरून चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून गरमागरम सर्व्ह करा.
टॅग्स : अन्नपाककृती