फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

Updated:April 16, 2025 18:50 IST2025-04-16T14:38:37+5:302025-04-16T18:50:31+5:30

Kitchen Tips: फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, जो शरीराला हानिकारक नाही असे आपण बऱ्याचदा ऐकतो. तसेच फळांच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याने फळं खाण्यावर भर देतो. मात्र फळांच्या वाढत्या किंमती आणि कृत्रिमरित्या केलेली त्यांची वाढ पाहता फळं खावीत की नाही हा प्रश्न उभा राहतो. त्यावर जाणून घेऊया उत्तर!

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

आरोग्यासाठी लाभदायी असलेली फळे खायला सर्वांनाच आवडतात. विशेषतः उन्हाळ्यात लोकांना हलके अन्न खायला आवडते. म्हणून फळे आणि दही, लस्सी सारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, खरबूज, संत्री अशी मुख्य पाच फळं गोड आहेत की आंबट हे कसे तपासायचे ते पाहू.

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

कारण अनेकदा उत्साहाने फळांची खरेदी होते आणि घरी आल्यावर फळं आंबट, तुरट चवीची लागतात. त्यामुळे फळांची पारख करण्याच्या टिप्स जाणून घेतल्या तर तुमच्या पदरी निराशा येणार नाही आणि फळांची नैसर्गिक गोडी चाखता येईल!

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

डाळिंब खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाला जास्त मागणी असते. मात्र अनेकदा डाळिंब घरी आणून चिरले की ते एवढे पांढरे फटक दिसते की, डाळिंबाला लाल रंग पुरवण्याची गरज आहे की काय असे भासू लागते. म्हणूनच अशी फसवणूक टाळण्यासाठी डाळिंब खरेदी करताना त्याचा शेंडा बघा तो उघडलेला असेल तर डाळिंब लाल आणि गोड असेल आणि शेंडा मिटलेला अर्थात बंद असेल तर ते डाळिंब कमी गोड असू शकते!

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

टरबूजाप्रमाणेच खरबूज देखील उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. पण खरबूज खरेदी करताना चूक होऊ नये म्हणून काळजीपूर्वक पहा की खरबूजावर पट्टे असतील आणि ते लांब असेल तर समजून घ्या की ते गोड आहे. पट्टे नसतील तर ते थोडे कच्चे आणि कमी गोड असू शकते.

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

गोड आणि आंबट संत्री खरेदी करण्यासाठी, तुम्हाला त्याच्या देठाची बाजू बघावी लागेल. ती बाजू आत रुतलेली आणि गडद रंगाची असेल तर समजून जा की संत्र आंबट गोड असेल. ते तसेच असायला हवे. अन्यथा ते फिकट रंगाच्या देठाचे असेल तर ते बेचव असू शकते.

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

बाजारात चढ्या भावाने विकले जाणारे ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण विकत घेऊनही ते बेचव निघाले तर पैसे वाया जाणार! तसे होऊ नये म्हणून ड्रॅगन फ्रुट खरेदी करताना त्याच्या देठाचा भाग बघा. जर ते ताजे असेल आणि हिरव्या पानांसह असेल तर ते गोड असेल. पण जर ते वाळले तर समजून जा की बेचव असेल.

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

हिरवी पपई कच्ची असते, ती चटणी, भाजी करण्यासाठी वापरता येते, पण फळ म्हणून पपई खायची असेल तर ती पूर्णपणे केशरी पिवळी असायला हवी. त्यावर हिरवट झाक असेल तर ती पपई पूर्ण पिकलेली नाही असे लक्षात येते.

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स! महागडी फळं घ्या निवडून..

बाजारात टरबुजाचे अनेक प्रकार दिसतात. लांबट, गोल, रेघांचे, बिना रेघांचे, शेंडी असलेले, नसलेले! या सगळ्या वेगवेगळ्या प्रजाती असल्या तरी त्याचा गुणधर्म सारखाच आहे. टरबूज विकत घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे टरबुजाचा बाह्य रंग! हिरवेगार टरबूज त्यावर पिवळी झाक असेल तर ते टरबूज कृत्रिम रित्या पिकवलेले नसून नैसर्गिक समजावे आणि खाण्यास योग्य आणि सुमधुर आहे हेही लक्षात घ्यावे.