गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

Published:September 16, 2023 05:16 PM2023-09-16T17:16:15+5:302023-09-16T17:24:06+5:30

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

१. खिरापत हा गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य, गणेशोत्सवासाठी तुम्ही खिरापत करणार असाल तर ती कमीत कमी वेळात एकदम झटपट कशी करायची, त्याच्या या काही सोप्या रेसिपी बघून घ्या... जास्त वेळही जाणार नाही. शिवाय गणरायासाठी पौष्टिक, चवदार नैवेद्य रोजच्या रोज केला जाईल.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

२. खिरापत करण्याची पहिली एकदम सोपी रेसिपी म्हणजे खोबरं आणि पिठीसाखर घालून केलेली खिरापत. यासाठी खोबऱ्याचे काप करून घ्या. ते भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाले की साखरेसोबत मिक्सरमधून फिरवून घ्या. एकदम बारीक पावडर करू नये. थोडे जाडेभरडेच ठेवावे.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

३. या रेसिपीसाठीही खोबऱ्याचे काप करून ते भाजून घ्या. नंतर थोडी खसखस आणि बदाम भाजून घ्या. थंड झाल्यावर खोबरे, साखर, बदाम, खारिकचे तुकडे, खसखस असं मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्या.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

४. तिसऱ्या रेसिपीमध्येही भाजलेले खोबरे वापरायचे आहे. वेलची कढईत थोडी गरम करून घ्या. थंड झाल्यावर भाजलेले खोबऱ्याचे काप, डिंक पावडर, गुळ आणि वेलची मिक्सरमधून फिरवून घ्या.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

५. सुकामेवा वापरूनही खिरापत करता येते. यासाठी काजू, बदाम, मनुका, अक्रोड, पिस्ते असा सगळा सुकामेवा थोडासा भाजून घ्या. त्यात थोडे खोबरेही भाजून टाका. आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड झाले की गूळ घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. गुळाऐवजी अंजीर किंवा खजूराचाही वापर करू शकता.

गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट

६. आता खिरापत करण्याची आणखी एक रेसिपी पाहू या. यासाठी आपल्याला २०० ग्रॅम ज्वारीच्या लाह्या, अर्धी वाटी डाळवं, अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक तुकडे, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि २ टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे. सगळ्यात आधी डाळवं, लाह्या, शेंगदाणे आणि खोबरे भाजून घ्या. त्यानंतर गूळ आणि तूप एकत्र गरम करून गुळाचा पाक करून घ्या. त्यात डाळवं, खोबरे, लाह्या, शेंगदाणे असं सगळं टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.... खिरापत किंवा पंचखाद्य झालं तयार.