स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

Published:November 2, 2023 06:01 PM2023-11-02T18:01:34+5:302023-11-02T18:06:40+5:30

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

आपला नेहमीचा स्वयंपाक करताना थोड्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तो नक्कीच जरा वेगळ्या चवीचा आणखी स्वादिष्ट होतो.त्या ट्रिक्स नेमक्या कोणत्या आहेत, ते आता पाहूया...

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

यापैकी सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसूरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल.

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल.

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

पुऱ्या खूप तेल पितात, अशी तुमचीही तक्रार असेल तर हा उपाय करून पाहा. पुऱ्या लाटून घ्या आणि नंतर १० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर तळायला घ्या. तेल खूप कमी लागेल.

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

बऱ्याचदा भाजी करपते. मग तिला करपट वास लागतो. तो वास घालविण्यासाठी भाजीमध्ये थाेडं दही घाला. वास निघून जाईल आणि भाजी स्वादिष्ट होईल.

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

पनीर खूपच कडक, वातड झालं असेल तर गरम पाण्यात थोडं मीठ घाला आणि त्यात १० मिनिटांसाठी पनीर ठेवून द्या. पनीर अगदी मऊ होईल.

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!

कणिक उरली असेल तर तिला तूप लावा आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कणिक काळी पडणार नाही आणि पोळ्याही मऊ होतील.