आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

Updated:October 15, 2023 08:05 IST2023-10-15T08:01:39+5:302023-10-15T08:05:01+5:30

Importance and benefits of Orange color food

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

आपल्या आयुष्यात जसे प्रत्येक रंगाला महत्त्व आहे, तसेच ते आहारातही आहे. त्यामुळे विविध रंगाच्या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश असायला हवा. नवरात्राच्या निमित्ताने आपण नारींगी म्हणजेच केशरी रंगाच्या पदार्थांचे महत्त्व समजून घेणार आहोत (Importance and benefits of Orange color food).

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

संत्री हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असून आपण नियमितपणे संत्री खायला हवीत. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तसेच त्वचा चांगली राहण्यासाठी संत्री फायदेशीर असतात.

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

भोपळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आरोग्यासाठी तो फायदेशीर असतो. डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी भोपळा उपयुक्त असतो. भोपळ्याचे घारगे, सूप, रायते, भाजी असे बरेच प्रकार करता येतात.

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

मसूर डाळीत इतर डाळींच्या तुलनेत 25 टक्के जास्त प्रथिनं असतात. तसेच लोह. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक ही खनिजं तसेच ब जीवनसत्व असतं. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहारात या डाळीचा समावेश असायलाच हवा.

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

पचनक्रिया सुधारण्यासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि रात्रीची गाढ-शांत झोप येण्यासाठी झोपताना केशर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये आवडीनुसार बदाम, पिस्ते घातल्यास याची पौष्टीकता आणखी वाढण्यास मदत होते. हेच केशर आपण विविध गोड पदार्थांमध्येही वापरु शकतो.

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

चवीला अतिशय गोड असणारे फळ वात आणि कफ प्रकृतीसाठी उपयुक्त असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. पपईमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी, ई आणि ए यांचेही प्रमाण चांगले असते.

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

गाजरात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असते, बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्रोत असलेले गाजर खाल्ल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. गाजराचा हलवा, गाजराची वडी, कोशिंबीर, सूप, तर कधी सॅलेड असे काहीही करता येते.