1 / 9शक्यतो आपण एकदा बाजारांत गेलो की किमान आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाज्या - फळे एकाच वेळी आणतो. फळे - भाज्या बाजारातून विकत आणल्यावर आपण सरळ फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. फ्रिजमध्ये भाज्या आणि फळे स्टोअर करुन ठेवल्याने ते खराब न होता जास्त दिवस टिकून राहण्यास आणि फ्रेश ठेवण्यास मदत होते. परंतु काहीवेळा आपण फळे आणि भाज्या कितीही काळजीपूर्वक स्टोअर करुन ठेवल्या तरी त्या अगदी कमी दिवसांतच खराब होतात. अशा खराब झालेल्या भाज्या आणि फळे आपल्याला फेकून देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. यासाठीच भाज्या - फळे खराब न होता जास्त दिवस चांगले टिकून राहण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवुयात(How to Store Vegetables to Keep them Fresh).2 / 9आलं बाजारांतून विकत आणल्यावर त्याची साल न काढताच ते हळदीच्या पाण्यांत बुडवून स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर सुक्या कापडाने व्यवस्थित पुसून मग ते टिश्यू पेपरमध्ये रॅप करुन घ्यावे. टिश्यू पेपरमध्ये रॅप केलेलं हे आलं एका झिपलॉक बॅगमध्ये भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवल्याने ते खराब होत नाही. 3 / 9 एका झिपलॉक बॅगमध्ये लसूण न सोलता सालीसकट टाकावा. त्यानंतर त्याच बॅगमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून चहा पावडर आणि मीठ घालूंन बॅगेचे तोंड बंद करून लसूण फ्रिजमध्ये न ठेवता कोरड्या जागी स्टोअर करुन ठेवावा. 4 / 9टोमॅटोच्या देटाकढील भाग काढून त्या जागी चिकटपट्टी चिटकवावी. चिकटपट्टी चिकटवताना देटाकडील भाग संपूर्ण चिकटपट्टी खाली झाकला जाईल याची काळजी घ्यावी. 5 / 9कांदे जास्त दिवस चांगले टिकवून ठेवण्यासाठी ज्या भांड्यात कांदे स्टोअर करुन ठेवत आहात त्या भांड्यात वर्तमानपत्राचे छोटे छोटे तुकडे करुन घालावेत. जेणेकरुन कांदा ओला असेल तर वर्तमानपत्र त्यातील ओलावा शोषून घेऊन कांदे खराब होण्यापासून आपण त्याचा बचाव करु शकतो. 6 / 9 ज्या भांड्यात बटाटे स्टोअर करुन ठेवले आहे त्याच भांड्यात एक सफरचंद ठेवावे. यामुळे बटाटे लवकर खराब होत नाहीत याशिवास, बटाट्यांना लगेच कोंब फुटत नाही. 7 / 9जर काकडी विकत घेताना खूपच सुकलेली असेल किंवा काकडी खराब न होताच जास्त दिवस चांगली फ्रेश टिकवून ठेवण्यासाठी काकडी कापायच्या आधी १० मिनिटे बर्फाच्या पाण्यांत भिजवून ठेवावी. यामुळे सुकलेली काकडीदेखील खायला अगदी फ्रेश होते. 8 / 9 सुकं खोबर साठवून ठेवल्याने काही दिवसानंतर त्याच्यावर बुरशी येऊन ते खराब होते. असे होऊ नये म्हणून आपल्या बोटावर थोडेसे तूप घेऊन ते सुक्या खोबऱ्याच्या आत हलकेच लावून घ्यावे. यामुळे सुकं खोबरं खूप दिवस टिकून राहात. 9 / 9अर्धा वापरलेला लिंबू खराब होऊ नये म्हणून तो फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवावा. फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवताना एका छोट्याशा वाटीत पाणी घ्यावे त्यात हा अर्धा कापलेला लिंबू उलटा ठेवावा म्हणजेच लिंबू जिथून अर्धा कापलेला आहे त्याच्या आतील बाजू दिसत आहे ती बाजू पाण्याच्या वाटीत बुडवून ठेवावी.