महिनाभर टिकेल आलंमिरची पेस्ट, ४ युक्त्या-पेस्टला ना बुरशी लागेल ना काळी पडेल, चवही राहील झणझणीत
Updated:February 17, 2026 18:00 IST2026-02-17T18:00:00+5:302026-02-17T18:00:01+5:30
ginger chilli paste: ginger garlic chilli paste: how to store ginger paste: आलंमिरची पेस्ट फ्रेश राहण्यासाठी ४ टिप्स लक्षात ठेवा.

भारतीय स्वयंपाकघरातील पदार्थ आले आणि हिरव्या मिरचीच्या पेस्टला अधिक महत्त्व आहे. फोडणीचा खमंग वास असो किंवा रस्सा भाजीचा झणझणीतपणा, या पेस्टशिवाय जेवण अपूर्णच वाटतं. रोजच्या धावपळीत पेस्ट रोज वाटणं शक्य होत नाही. त्यासाठी आपण आठवड्याभराची पेस्ट तयार करुन ठेवतो. पण अगदी २ ते ३ दिवसात ती खराब होते, बुरशी लागते.
अनेकदा दोन-तीन दिवसांत या पेस्टचा रंग देखील बदलतो, चव कडवट लागते. ही समस्या टाळण्यासाठी आणि पेस्ट फ्रेश राहण्यासाठी ४ टिप्स लक्षात ठेवा.
पेस्ट साठवण्यासाठी आपण पेस्ट वाटताना त्यात पाणी अजिबात वापरु नका. त्याऐवजी १ ते २ चमचे तेल आणि थोडे मीठ घाला. मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हचे काम करते. यामुळे ही पेस्ट फ्रिजमध्ये १५ ते २० दिवस सहज टिकते.
आपल्याला ही पेस्ट १ ते २ महिने टिकवायची असेल तर वाटताना त्यात १ चमचा पांढरे व्हिनेगर घाला. यामुळे रंग पेस्टचा रंग काळा होणार नाही आणि बुरशी देखील लागत नाही.
तयार केलेली पेस्ट आपण आईस ट्रेमध्ये ठेवू शकतो. नंतर झिपलॉक बॅगमध्ये भरुन फ्रीजरमध्ये ठेवा. रोज १ क्यूब आपल्याला वापरता येईल.
हळद अँटी- बॅक्टेरियल असते. पेस्ट वाटताना त्यात अर्धा चमचा हळद घाला. ज्यामुळे पेस्टला बुरशी लागणार नाही, आणि चवही टिकून राहिल.
पेस्टचा उपयोग करताना नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करा. ओला चमचा किंवा हात लावल्यास पेस्टला लवकर बुरशी लागते आणि ती खराब होते.