स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

Updated:April 5, 2026 18:00 IST2026-04-05T18:00:00+5:302026-04-05T18:00:03+5:30

Keeping garlic fresh and white for long time: Does garlic need to be refrigerated or not: पाहूया लसूण साठवण्यासाठी काही खास ट्रिक्स.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

लसणाच्या फोडणीशिवाय वरण-भाजीला चव येत नाही. पण हाच लसूण जेव्हा हवामानातील बदलामुळे मऊ पडतो किंवा त्याला बुरशी लागते. त्यामुळे आपण बाजारातून किलोने लसूण आणतो, पण तो नीट साठवता न आल्याने अर्धा लसूण कचऱ्याच्या पेटीत जातो. काहीजण लसूण फ्रीजमध्ये स्टोर करतात. पण यामुळे तो लवकर खराब होतो. (Keeping garlic fresh and white for long time)

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर महिनाभर लसूण फ्रेश राहिल इतकंच नाही तर बुरशी देखील लागणार नाही. पाहूया लसूण साठवण्यासाठी काही खास ट्रिक्स. (Does garlic need to be refrigerated or not)

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

लसणाचा गड्डा फोडू नका. यामुळे त्याचे नैसर्गिक संरक्षण कवच नष्ट होते आणि त्यातील ओलावा हवेत उडून जातो,यामुळे तो लवकर सुकतो.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

प्लास्टिकच्या पिशवीत लसूण ठेवल्यास दमटपणा येतो ज्यामुळे बुरशी लागते. साधी कागदी पिशवी घ्या, त्याला कात्रीने छोटे ५ ते ६ होल पाडा. यात लसूण भरुन ठेवा. कागद जास्तीचा ओलावा शोषून घेतो. ही पिशवी स्वयंपाकघरातील कोरड्या, अंधाऱ्या खोलीत ठेवा.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

लसूण बटाट्यांच्या टोपलीत ठेवला तर लसणाला लवकर मोड येतात. त्यामुळे कांदे आणि बटाट्यापासून लसणाला लांब ठेवा.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

लसणाच्या पाकळ्या सोलून एका काचेच्या बरणीत भरा. त्यावर खाण्याचे तेल ओता ज्यामुळे पाकळ्या बुडतील. ही बरणी फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पाकळ्यांना हवा लागणार नाही. त्या महिनाभर ताज्या राहतील.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

फ्रीजमधील थंडावा लसणाला खराब करतो आणि त्याची चव घालवतो. फक्त सोललेल्या पाकळ्याच फ्रिजमध्ये ठेवाव्यात.

स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही

एखाद्या लसण्याच्या पाकळीला काळी बुरशी दिसली, तर ती लगेच काढून टाका, नाहीतर संपूर्ण गड्ड्याला खराब करेल.