Join us
Daily Top 2 Weekly Top 5

भाजीपाल्यापासून दुधापर्यंत फ्रिजशिवाय सर्व काही राहील ताजं! उन्हाळ्यात अन्न खराब न होण्यासाठी ८ स्मार्ट ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 20:00 IST

1 / 10
सध्याच्या रणरणत्या उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होणं ही प्रत्येक घरातील मोठी समस्या असते. विशेषतः फ्रिज उपलब्ध नसल्यास किंवा सतत वापर शक्य नसल्यास अन्न ताजं ठेवणं अधिकच अवघड होतं. उकाडा, आर्द्रता आणि जास्त तापमानामुळे अन्न पटकन बिघडतं, त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. पण काळजी करू नका! आपल्या पारंपारिक पद्धती आणि काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने फ्रिजशिवायही अन्न बराच वेळ ताजं ठेवता येऊ शकतं. योग्य साठवण, नैसर्गिक उपाय आणि काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास अन्नाची चव आणि गुणवत्ता दोन्ही टिकवून ठेवणं शक्य आहे(how to keep food fresh without refrigerator in summer).
2 / 10
कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे 'अन्न खराब होणे'. दुपारची भाजी संध्याकाळपर्यंत टिकत नाही, दूध फाटतं आणि भाज्या सुकतात. पण प्रत्येक वेळी फ्रिज असलाच पाहिजे असं नाही. परंतु आपल्याकडे अशा काही सोप्या ट्रिक्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण फ्रिजशिवायही जेवण तासंतास ताजे, फ्रेश ठेवू शकतो(best ways to preserve food in hot weather naturally).
3 / 10
पालेभाज्या आणि फळभाज्या सुती (कॉटन) कपड्यात गुंडाळून ठेवा. कपडा वाळल्यास त्यावर पाण्याचा शिडकावा करा. यामुळे भाज्यांचा टवटवीतपणा टिकून राहतो.
4 / 10
शिजवलेलं अन्न (उदा. आमटी, भाजी) एका भांड्यात काढून ते भांडे पाण्याने भरलेल्या मोठ्या ताटात किंवा परातीत ठेवा. या पाण्यामुळे अन्नाला नैसर्गिक थंडावा मिळतो.
5 / 10
दुधाला दिवसातून किमान २ ते ३ वेळा चांगली उकळी आणा. याने दूध फाटत नाही आणि जास्त काळ टिकते.
6 / 10
बटाट्याचा पोत आणि चव टिकवण्यासाठी कांदे आणि बटाटे कधीही एकत्र ठेवू नका. ते नेहमी हवेशीर, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवा.
7 / 10
कोथिंबीर, कढीपत्ता, आणि पुदिना वर्तमानपत्रात किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. कागद जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि पाने काळी पडत नाहीत.
8 / 10
लिंबांना थोडं गोडेतेल (खाण्याचे तेल) लावून एका बरणीत किंवा डब्यात ठेवा. यामुळे लिंबांची साल सुकत नाही आणि लिंबू जास्त काळ रसाळ राहतात.
9 / 10
कणिक मळताना त्यात थोडं तेल आणि मीठ जास्त घाला, कणिक लवकर आंबट होत नाही. तसेच, कापलेल्या फळांवर किंवा भाज्यांवर थोडं मीठ किंवा लिंबू पिळल्यास ते काळे पडत नाहीत.
10 / 10
शक्य असल्यास भाज्या किंवा फळे ठेवण्यासाठी मातीच्या पसरट मडक्याचा वापर करा. मडक्याभोवती ओली वाळू किंवा पाण्याने ओलं केलेलं कापड गुंडाळून ठेवल्यास तो तुमचा नैसर्गिक 'कुलर' बनतो.
टॅग्स : अन्नहोम रेमेडीउन्हाळासमर स्पेशलकिचन टिप्स