Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कॉफी पावडर कडक दगड होते- गोळे होतात? 'या' पद्धतीने ठेवा- महिनोंमहिने राहिल फ्रेश- मिळेल कॅफेसारखी कडक कॉफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2026 16:30 IST

1 / 7
सकाळची सुरुवात वाफाळलेल्या कडक कॉफीने झाली की दिवसभर आपण उत्साही असतो. पण अनेकदा असं होतं की आपण आवडीने कॉफीचा नवीन डबा आणतो आणि काही दिवसांतच त्यातील पावडर कडक होऊ लागते किंवा तिचे गोळे जमतात.(Coffee powder storage tips)
2 / 7
कडक झालेली कॉफी नीट विरघळत नाही आणि तिची चव व सुगंध दोन्ही निघून जातात. कॉफी पावडरला हवा किंवा पाणी लागले की तिचे गोळे जमतात किंवा ती चिकट होते. असं आपल्यासोबत होऊ नये यासाठी या ५ टिप्स लक्षात ठेवा. (How to store coffee powder)
3 / 7
कॉफी पावडर नेहमी काचेच्या हवाबंद डब्यात साठवा. प्लास्टिकच्या डब्यात कधीकधी वास राहतो, ज्यामुळे कॉफीचा सुगंध नीट येत नाही. डबा उघडल्यानंतर तो लगेच घट्ट बंद करा.
4 / 7
आपण फ्रीजमध्ये कॉफी पावडर साठवल्यानंतर तापमानातील बदलामुळे डब्यात त्याची वाफ तयार होते, ज्यामुळे कॉफी पावडर ओलसर होऊन खराब होते. त्याऐवजी कॉफी किचनमधील कोरड्या ठिकाणी ठेवा.
5 / 7
कॉफीचा डबा खिडकीजवळ किंवा गॅसच्या अगदी बाजूला ठेवू नका, यामुळे ती लवकर खराब होते.
6 / 7
कॉफी पावडर वापरताना पाण्याचा एकही थेंब लागणार नाही याची काळजी घ्या. कोरड्या चमच्याचा वापर करा.
7 / 7
लहान मलमलच्या कपड्यात किंवा टिश्यू पेपरमध्ये १ चमचा कच्चे तांदूळ बांधून त्याची छोटी पुडी बनवा आणि ती कॉफीच्या डब्यात टाका. तांदूळ आर्द्रता शोषून घेतात, ज्यामुळे कॉफी पावडर फ्रेश राहते.
टॅग्स : अन्नकिचन टिप्स