कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

Updated:October 31, 2025 20:26 IST2025-10-31T19:54:52+5:302025-10-31T20:26:27+5:30

How To Stop Dal Spilling in a Pressure Cooker : डाळ शिजायला ठेवण्यापूर्वी कुकरमधील डाळ आणि पाण्यावर एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला.

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

कुकरमधून वरण बाहेर येतं त्यामुळे गॅस, ओटा, शेगडी सर्व खराब होते आणि काम वाढतं. कुकरमधून पाणी बाहेर येणं टाळण्यासठी तुम्ही कुकर वापरताना काही सोप्या टिप्स वापरू शकता. ज्यामुळे पदार्थ व्यवस्थित शिजेल. (How To Stop Dal Spilling in a Pressure Cooker)

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. साधारणपणे डाळीच्या पातळीपेक्षा फक्त १ ते दीड इंच जास्त पाणी ठेवा. जास्त पाणी झाल्यास ते फसफसून बाहेर येतं. (How To Stop Water Coming Out Of a Pressure Cooker)

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

डाळ शिजायला ठेवण्यापूर्वी कुकरमधील डाळ आणि पाण्यावर एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. तेल किंवा तुपामुळे एक पातळ थर तयार होतो. ज्यामुळे फेस किंवा वाफ बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते.

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

मीठामुळे फेस जास्त लवकर तयार होतो. ज्यामुळे डाळ शिजायला ठेवताना मीठ न घालता कुकर उघडल्यानंतर किंवा डाळ अर्धी शिजल्यानंतर घाला.

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

कडधान्य शिजवताना त्यात चिमूटभर हळद घातल्यास फेस कमी होतो. कुकर कधीही पूर्ण भरू नका. कुकरमध्ये डाळ आणि पाणी समान असावे. जेणेकरून फेस यायला पुरेशी जागा मिळेल.

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

कुकरची पहिली शिट्टी होईपर्यंत गॅसची आच मध्यम ठेवा. पहिली शिट्टी झाल्यावर आच मंद करा. मंद आचेवर शिजवल्यानं फसफसण्याचे प्रमाण कमी होते.

कुकरमधून डाळ, पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

झाकण, रबर आणि शिटी स्वच्छ असल्याची खात्री करा. जर व्हेंट पाईपमध्ये काही अडथळा असतील तरीही फेस बाहेर येऊ शकतो.