कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

Updated:November 16, 2025 10:00 IST2025-11-16T10:00:00+5:302025-11-16T10:00:01+5:30

how to stop coffee powder from hardening : prevent coffee powder clumping : home hacks to save coffee powder : ऋतुनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी पावडर स्टोअर करून ठेवल्यास, कॉफी पावडर जास्त काळ टिकते.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

कॉफी प्यायल्याने आपण रिफ्रेश फील करतो. आपण सहसा घरात बरीच माणसं कॉफी पिणारी असली की, कॉफीची मोठी बरणी विकत आणतो. ही कॉफीची बरणी सिलपॅक असलेली एकदा उघडली की ती परत सिलपॅक करता येत नाही. परिणामी, हवेच्या संपर्कात आल्यामुळे बरणीतली कॉफीचे गठ्ठे तयार होतात(how to stop coffee powder from hardening).

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

काहीवेळा वातावरणातील आर्द्रतेमुळे ही कॉफी ओली होऊन तिचे (prevent coffee powder clumping) गठ्ठे तयार होतात. अशी कॉफी वापरण्यायोग्य रहात नाही. असावेळी नक्की काय करावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. कॉफी बराच काळ स्टोअर करून ठेवल्यामुळे काहीवेळा तिचा रंग आणि चव देखील बदलते. असे होऊ नये म्हणून कॉफी पावडर स्टोअर करण्याची योग्य पद्धत समजून घेऊ.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

१. कॉफी पावडर नेहमी काचेच्या किंवा सिरेमिकच्या हवाबंद डब्यामध्ये साठवा. डब्याचे झाकण घट्ट लागते आहे की नाही, हे तपासा.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

२. आपण कॉफीच्या बाटलीतून चमचाच्या मदतीने हवी तेवढी कॉफी बाहेर काढतो. ही कॉफी आपण चमच्याने गरम दूधात किंवा पाण्यात घालतो. जेव्हा आपण कॉफी चमच्याने गरम दूधात किंवा पाण्यात घालतो, तेव्हा वाफ त्या चमच्याला लागते. परिणामी, चमचा ओला होऊन कॉफी त्या चमच्यालाच चिकटून बसते. असा ओला चमचा जर आपण परत त्या कॉफीच्या बाटलीत ठेवला तर कॉफीचे गट्ठे तयार होऊन ती खराब होण्याची शक्यता असते. या कारणामुळे शक्यतो, कॉफीच्या बाटलीत ओला चमचा ठेवू नये किंवा कॉफी करताना प्रत्येक वेळी नवीन चमच्याचा वापर करावा.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

३. आपण ज्या बाटलीत किंवा डब्यामध्ये कॉफी पावडर स्टोअर करणार आहात, त्यामध्ये आधी काही तांदळाचे दाणे टाकून मग त्यात कॉफी पावडर ओतावी. यामुळे कॉफीचा स्वाद टिकून राहतो. अशाप्रकारे आपण अनेक महिन्यांपर्यंत या स्टोअर केलेल्या कॉफी पावडरचा वापर करू शकतो. या ट्रिक्सचा वापर करून आपण कॉफीचा स्वाद जसा आहे तसाच टिकवून ठेवू शकता. यामुळे कॉफीचा स्वाद बदलत नाही आणि आपल्याला योग्यरित्या कॉफी पावडर स्टोअर करता येते.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

४. अनेकदा असे होते की, काचेच्या बाटलीत भरून ठेवलेल्या कॉफी पावडरला लगेच काही दिवसातच त्यामध्ये गाठ किंवा गट्ठे तयार होतात. कॉफी पावडर जमू लागण्याची ही सुरुवात असते. अशावेळी या कॉफी पावडरचे गट्ठे तयार होऊ नयेत म्हणून आपण एक सोपा उपाय करू शकतो. कॉफी पावडर काचेच्या बाटलीतून बाहेर काढा. ही बरणी व्यवस्थित स्वच्छ करा आणि बाटलीच्या तळाशी एक टिश्यू पेपर ठेवा. आता त्यात १ चमचा चहा पावडर घाला आणि मग वरून कॉफी पावडर ओता. असे केल्यामुळे कॉफीमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

५. कॉफीच्या बाटलीचे सिलपॅकिंग एकदा उघडल्यानंतर परत ते सिलपॅकिंग करता येत नाही. अशावेळी एका चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकने त्या बाटलीचे तोंड झाकून घ्या. त्यानंतर त्यावर बाटलीचे झाकण लावून फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवा. इतकेच नाही तर कॉफीजारमध्ये कायमचा चमचा ठेवू नका. याशिवाय, कॉफी काढताना कोरड्या चमच्याचा किंवा लाकडी चमच्याचा वापर करावा. यामुळे कॉफी खराब होणार नाही आणि अधिक काळ टिकण्यास मदत होईल.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

६. ऋतू कोणताही असो कॉफी पावडर जर योग्यरित्या स्टोअर केली नाही तर ती खराब होतेच. यासाठी प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी पावडर स्टोअर करून ठेवावी. आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये कॉफी पावडर स्टोअर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकता. जसे उन्हाळ्याच्या दिवसात आपण कॉफी पावडरच्या डब्यात खडीसाखरेचे तुकडे घालू शकतो. हिवाळ्याच्या दिवसात कॉफी पावडरच्या डब्यात आपण सुंठ घालून ठेवू शकतो. तर पावसाळ्याच्या दिवसात कमळाच्या बिया किंवा लवंगाचाहीचा वापर करू शकतो. असे केल्यामुळे कॉफी खराब होत नाही आणि त्याला गुठळ्याही होत नाहीत.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

७. जर तुम्ही कॉफीची मोठी बरणी आणली असेल, तर पावडर लहान भागांमध्ये विभागून घ्या. रोज लागणारी पावडर एका लहान डब्यात ठेवा आणि बाकीची सीलबंद करून ठेवा. यामुळे मोठ्या बरणीत वारंवार हवा शिरत नाही.

कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ८ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...

८. खूप आर्द्रता असेल तर कॉफीच्या डब्यात एक छोटी, उघडी मीठाची डबी ठेवा. मीठ ओलावा खेचतं आणि कॉफी कोरडीच राहते.