भरपूर लसूण सोलला की हातांचा तीव्र गंध जात नाही? ८ उपाय - जळजळ आणि वास दोन्ही त्रास कमी...
Updated:May 28, 2025 14:54 IST2025-05-28T14:22:16+5:302025-05-28T14:54:49+5:30
How to Get the Smell of Garlic Off Hands : 8 Tricks for Getting Garlic Smells Off Your Hands : Remove Garlic Smell From Hands After Mincing : How to Remove Garlic Smell From Your Hands : लसूण पाकळ्या सोल्ल्यांनंतर, हातांची जळजळ होऊ नये, हातांना त्याचा तीव्र गंध येऊ नये यासाठी सोपे उपाय...

'लसूण' हा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा (How to Remove Garlic Smell From Your Hands) एक महत्त्वाचा आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. त्याची खास चव आणि (How to Get the Smell of Garlic Off Hands) औषधी गुणधर्मांमुळे लसूण अनेक पदार्थांमध्ये हमखास वापरला जातो. फक्त फोडणी पुरताच नाही तर, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लसूण घालून त्या पदार्थांची चव वाढवण्यास मदत होते.
भाजी, आमटी, डाळ कोणताही पदार्थ करायचा (8 Tricks for Getting Garlic Smells Off Your Hands) म्हणजे 'लसूण' लागतोच. यासाठी, बहुतेक गृहिणी लसूण दररोजच्या वापरासाठी लागतो म्हणून रोज लसूण पाकळ्या सोलत बसण्याची झंझट नको म्हणून, एकदम एकाच वेळी सोलून ठेवतात. परंतु अशा प्रकारे, एकाचवेळी ढीगभर लसूण पाकळ्या सोल्ल्यांनंतर, हाताच्या बोटांची जळजळ होते शिवाय त्याचा तीव्र गंध कितीहीवेळा हात धुवून जात नाही.
यासाठी, लसूण पाकळ्या सोल्ल्यांनंतर, हातांची जळजळ, आग होऊ नये शिवाय हातांना त्याचा तीव्र गंध येऊ नये यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात.
१. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर :-
हात स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला जसे की चमचा, वाटी, नळ यांवर चोळा आणि पाण्याने धुवा. या उपायामुळे स्टेनलेस स्टील लसणाचा तीव्र गंध शोषून घेतो. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.
२. लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड :-
लसूण सोलून झाल्यानंतर हातांवर लिंबाचा रस लावा किंवा लिंबाची फोड चोळा. यामुळे लसणाचा वास नाहीसा होतो आणि हातांची आग, होणारी जळजळ देखील कमी होण्यास मदत होते.
३. बेकिंग सोडा आणि पाणी :-
हा उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळा आणि त्याची पातळसर पेस्ट करून ही पेस्ट हातांवर चोळा २ ते ३ मिनिटे ही पेस्ट हातांवर तशीच राहू द्यावी त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यावेत. लसणाचा तीव्र गंध झटपट निघून जाण्यास मदत होते.
४. व्हिनेगर :-
लसणाचा तीव्र सुगंध हातांवरून घालवण्यासाठी थोडेसे व्हिनेगर हातावर घेऊन चोळा. नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. या उपायामुळे लसणाचा वास दूर होण्यास मदत होते.
५. दुध किंवा दह्याचा वापर :-
दूध किंवा दही वापरुन देखील आपण लसणाची दुर्गंधी हातांवरुन अगदी सहजपणे घालवू शकतो. हातांवर थोडं दुध किंवा दही चोळा आणि मग हात पाण्याने स्वच्छ धुवा. दही व दुधातील फॅटस हा वास शोषून घेण्यास मदत करते.
६. कॉफी पावडर :-
लसणाचा तीव्र गंध घालवण्यासाठी थोडीशी कॉफी पावडर घेऊन ती थेट हातांवर चोळा, नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या. कॉफीचा सुगंध लसणाचा वास कमी करण्यास मदत करतो.
७. टोमॅटोचा रस :-
हातांना येणारा लसणाचा तीव्र गंध कमी करण्यासाठी थोडा टोमॅटोचा रस हातावर घासा आणि चोळा, नंतर पाण्याने धुवा. टोमॅटोचा अॅसिडिक गुणधर्म लसणाचा वास कमी करतो.
८. साखर आणि लिंबू :-
साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याची तयार पेस्ट हलकेच हातांवर चोळून घेतल्याने, हातांचा वासही कमी होतो आणि त्वचाही स्वच्छ होते.