बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

Updated:August 20, 2025 10:10 IST2025-08-20T10:00:00+5:302025-08-20T10:10:01+5:30

How to remove excess oil from pakoda : Tips to reduce oil in pakora : How to make pakoras less oily : Best way to drain oil from pakoda : Kitchen hacks for oil-free pakoras : बाहेर पडणारा पाऊस पाहून भजी खायची इच्छा झाली, पण भजी तेलकट होऊ नये यासाठी खास टिप्स पाहा...

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

पावसाळा ऋतू असलयाने सध्या बाहेर खूप जोरदार (Best way to drain oil from pakoda) पाऊस सुरु आहे. बाहेरचे थंडगार वातावरण आणि मुसळधार कोसळणारा पाऊस पाहून मस्त गरमागरम भजी खाण्याची इच्छा तर होतेच. अशा वेळी जर कुणी समोर गरमागरम भजी आणून ठेवली तर सगळेच ताव मारुन मिनिटांत भजी फस्त करतील. परंतु पावसाळ्यात असा आनंद घेण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणे गरजेचे असते. वारंवार अशा प्रकारचे तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

भजी कोणतीही असो ती तेलात तळली जाते. कढईत कुरकुरीत आणि खुसखुशीत (How to remove excess oil from pakoda) होईपर्यंत डीप फ्राय केली जाते. अनेकदा भजी तळल्यानंतर त्यात खूप तेल राहते. हाताला तेल लागते. अशा प्रकारे जास्तीचे तेलकट पदार्थ खाणे कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी विकार असलेल्यांसाठी हानिकारक ठरु शकते.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

अशा परिस्थितीत, आपण काही सोप्या टिप्स समजून घेऊयात, ज्यामुळे भजी केली तरी त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

१. भजी किंवा कोणताही तळणीचा पदार्थ तळताना, नेहमी मोठी कढई किंवा पॅनचा वापर करावा. जर लहान पॅन किंवा कढई वापरली, तर भजी कुरकुरीत होणार नाहीत आणि ती व्यवस्थित तळण्यासाठी जास्त तेलही लागेल. अनेकदा आपण लहान पॅन किंवा छोटी कढई वापरण्याची चूक करतो, ज्यामुळे भज्या फारच तेलकट होतात.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

२. बरेचजण भजी तळताना गॅस खूप मंद आचेवर ठेवतात. भजी किंवा कोणताही तळणीचा पदार्थ तळताना कधीही गॅस मंद आचेवर ठेवू नका. गॅसची आच नेहमी मध्यम ठेवा. मंद आचेवर भजी तळल्यास ती खूप तेलकट होते.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

३. भजी किंवा कोणताही तळणीचा पदार्थ तळाल, तेव्हा तेलात एक चिमूट मीठ घाला. एक चिमूटभर मीठ घातल्याने भजी अजिबात तेलकट होणार नाहीत.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

४. बरेचदा आपण भजी तळताना कढईत खूप कमी तेल घेऊन त्यात तळतो , पण असं केल्याने भजी एकमेकांना चिकटतात आणि अधिकच तेलकट होतात. त्यामुळे, भजी तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या याचबरोबर, तेल चांगलं गरम करून घ्या यामुळे भजी तेलकट होणार नाही.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

५. कढईत एकाच वेळी जास्त भजी एकदम तळायला घालू नका. यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि भजी तेलकट होतात. थोड्या-थोड्या प्रमाणात भजी तळा, ज्यामुळे भजी कुरकुरीत होतील आणि जास्त तेलकट देखील होणार नाहीत.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

६. तळलेली भजी लगेच टिशू पेपरवर किंवा जाळीदार चाळणीत ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि भजी कमी तेलकट होतील.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

७. पिठात थोडं तांदळाचं पीठ किंवा रवा मिसळल्यास भजी कमी तेलकट व खमंग होतात.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ८ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

८. भजीसाठी पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. पिठाची जाडी योग्य असेल तर भजी जास्त तेल शोषून घेणार नाहीत आणि कुरकुरीत होतील.