शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

Updated:May 10, 2025 09:20 IST2025-05-10T09:14:38+5:302025-05-10T09:20:01+5:30

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

रात्रीच्या जेवणाच्या वेळी बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या बऱ्याच पोळ्या उरलेल्या असतात. त्यांच्या जोडीला थोडी भाजी केली की काम सोपं होऊन जातं.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

पण सकाळच्या थंड झालेल्या पोळ्या रात्री पुन्हा खाणं अनेकांना आवडत नाही. महागाई एवढी वाढलेली असताना त्या उरलेल्या पोळ्या टाकून देणंही बरं वाटत नाही. अशावेळी तुम्ही हा एक मस्त उपाय करून पाहू शकता..

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

हा उपाय केल्याने तुमच्या थंडगार झालेल्या सकाळच्या पोळ्या अगदी अवघ्या एका मिनिटांत गरमागरम होतील. तूप लावून त्या सर्व्ह केल्या तर पोळ्या सकाळच्या आहेत की आता नुकत्याच केलेल्या आहेत हे देखील खाणाऱ्यांना लक्षात येणार नाही.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

हा उपाय करण्यासाठी कुकरमध्ये पाणी घाला आणि कुकर गॅसवर गरम करायला ठेवा. कुकरच्या तळाशी एखादी वाटी ठेवा.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

आता पोळ्या एखाद्या कपड्यात गुंडाळून एका डब्यात घालून झाकण लावून कुकरमध्ये १ मिनिटासाठी ठेवून द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि पोळ्या कुकरमधून काढून घ्या.

शिळ्या पोळ्या कुकरमध्ये ठेवा आणि जादू पाहा! १ मिनिटांत होतील ताज्या पोळीसारख्या गरमागरम

सगळ्याच्यासगळ्या पोळ्या अगदी गरमागरम, मऊसूत झालेल्या असतील. तव्यावर तूप लावूनही थंड पोळ्या गरम करता येतात. पण त्यासाठी प्रत्येक पोळी वेगवेगळी घेऊन गरम करावी लागते. त्यात खूप वेळही जाते. त्यापेक्षा ही युक्ती जास्त चांगली वाटते. एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही.