चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

Updated:October 11, 2025 09:40 IST2025-10-11T09:40:00+5:302025-10-11T09:40:02+5:30

How to prevent chivda from getting soft : Tips & Tricks to make poha chivda crispy : How to keep poha chivda crunchy : चिवडा तयार करुन कितीही काळजी घेऊन व्यवस्थित स्टोअर केला तरीही सदळतो, मग या टिप्स पाहा...

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

दिवाळीच्या फराळात पोह्यांचा चिवडा हा सगळ्यांचाच आवडता आणि झटपट तयार होणारा पदार्थ... परंतु बरेचदा चिवडा काही दिवसातच मऊ पडतो, ओलसर होतो आणि त्याचा कुरकुरीतपणा हरवतो. अशावेळी चिवड्याची मूळ चव आणि कुरकुरीपणा टिकवण्यासाठी काही सोपे (How to keep poha chivda crunchy) पण महत्वाचे उपाय फायदेशीर ठरु शकतात. साध्यासोप्या टिप्स वापरुन आपण चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत आणि चविष्ट ठेवू शकतो(How to prevent chivda from getting soft).

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

चिवडा बनवण्यापूर्वी पातळ पोहे १ ते २ तास कडक उन्हात ठेवून वाळवा. किंवा पोहे मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. यामुळे त्यातील ओलावा निघून जातो आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत रहातो.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

खूप जास्त तेल वापरल्यास चिवडा मऊ पडतो. हलक्या तेलात फक्त मसाले फोडणीसाठी वापरा. शेंगदाणे, खोबरं आणि मसाला असलेली फोडणी गरम असताना पोह्यांमध्ये मिसळू नका. फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्या.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात स्टोअर करुन ठेवा. गरम चिवडा डब्यांत भरल्यास आत ओलावा तयार होतो. भाजलेले गरम पोहे लगेच डब्यात किंवा भांड्यात न काढता, एका मोठ्या कागदावर किंवा ताटात लांब पसरवून ठेवा, जेणेकरून त्यांची वाफ निघून जाईल आणि ते कुरकुरीत राहतील.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

चिवड्यात चवीनुसारच मीठ घाला, जास्त मीठ ओलावा खेचते, त्यामुळे चिवडा पटकन मऊ पडतो.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, डाळ्या आणि कढीपत्ता यांसारखे साहित्य व्यवस्थित न तळल्यास ते पोह्यांचा कुरकुरीतपणा कमी करतात. खोबरं आणि कढीपत्ता मंद आचेवर सोनेरी आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळा. कढीपत्ता नरम राहिल्यास चिवडा लगेच सादळतो.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

चिवड्याच्या डब्यात चुकूनही ओला चमचा घालू नका, कारण त्यामुळे लगेच चिवडा मऊ पडतो.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

जर तुम्हाला चिवड्यासोबत शेव किंवा फरसाण मिक्स करुन खायला आवडत असेल, तर ते खायच्यावेळी मिसळून वरून मिसळून घ्या. ते चिवड्यात एकत्र मिसळून ठेवू नका, कारण फरसाणातील ओलावा पोह्यांना नरम करू शकतो.

चिवडा मऊ पडतो, सादळतो? ८ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...

पोहे भाजताना त्यात थोडेसे बारीक तांदुळाचे पीठ किंवा थोडा रवा घाला. यामुळे पोह्यांच्या पृष्ठभागवर हलकीशी कोटिंग तयार होते. यामुळे चिवडा मऊ होत नाही किंवा न सादळता तो जास्त दिवस कुरकुरीत रहातो.