डब्यात ठेवल्या की चपात्या वाफेनं ओल्या होतात? ८ टिप्स, न सादळता चपात्या राहतील मऊ
Updated:February 18, 2026 16:31 IST2026-02-18T15:25:01+5:302026-02-18T16:31:03+5:30
How To Prevent Chapatis From Getting Soggy : चपात्या डब्यात ठेवल्यानंतर लगेच झट्ट झाकण न लावता 2 ते 3 मिनिटं डबा उघडा ठेववावा जेणेकरून जास्तीची वाफ निघून जाईल.

चपातीच्या डब्यात चपात्या ओल्या होणं ही एक सामान्य समस्या आहे. ज्याला आपण सहसा चपातीला पाणी सुटणं असं म्हणजे. हे होऊ नये आणि चपात्या मऊसूत राहाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स पाहू. (How To Prevent Chapatis From Getting Soggy)
गरम चपातीतून वाफ बाहेर येत असते. जेव्हा आपण गरम चपाती लगेच डब्यात भरतो तेव्हा ती वाफ डब्याच्या झाकणाला धडकते आणि त्याचे रुपांतर पाण्याच्या थेंबात होते. (How To Store Chapati Without Getting Soggy)
पूर्णपणे हवाबंद असल्यास वाफेला बाहेर जाण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ती चपातीवरच पडते आणि खालच्या चपात्या मऊ किंवा ओल्या होतात.
चपात्या डब्यात ठेवण्यापूर्वी त्यात एका सुती कापडात गुंडाळून ठेवाव्यात. कापड वाढीव वाफ शोषून घेते. ज्यामुळे चपाती कोरडी राहते.
चपाती तव्यावरून काढल्यानंतर लगेच डब्यात न भरता एका जाळीवर किंवा मोकळ्या ताटात 30 ते 40 सेकंद ठेवा. यामुळे सुरूवातीची अतिउष्ण वाफ निघून जाते आणि डब्यात पाणी साचण्याचं प्रमाण कमी होतं.
डब्याच्या तळाशी एक लहान स्टिलची जाळी किंवा स्टॅण्ड ठेवल्यास खालच्या चपातीला थेट वाफ लागत नाही आणि ती ओली होत नाही.
चपात्या डब्यात ठेवल्यानंतर लगेच झट्ट झाकण न लावता 2 ते 3 मिनिटं डबा उघडा ठेववावा जेणेकरून जास्तीचा वाफ निघून जाईल.
जर कापड उपलब्ध असेल तर डब्याच्या तळाशी आणि वरच्या बाजूला किचन पेपर टॉवेल ठेवल्यानंही ओलावा कमी होतो.