1 / 7भारतीय घरातील जेवण चपातीशिवाय अपूर्णच. आपल्याकडे चपाती रोज खाल्ली जाते. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि सहज पचतात. (Soft chapati recipe) 2 / 7मधुमेह किंवा कोलेस्टेरॉल असणाऱ्या लोकांना गव्हाचे किंवा इतर पदार्थ कमी प्रमाणात खायला सांगितले जातात. इतकंच नाही तर वजन कमी करणारे अनेकजण एक वेळची चपाती खात नाही. आपल्या चपातीला अधिक पौष्टिक बनवायची असेल तर गव्हाच्या पीठात हे ५ पदार्थ नक्की घाला. (Easy trick to make roti puff up perfectly)3 / 7आपल्या चपातीला अधिक पौष्टिक करायची असेल तर आपण त्यात अळशीचा पावडर घालू शकतो. अळशीमध्ये ओमेगा- ३ फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे आपल्याला भरपूर पोषण मिळते. 4 / 7आपण चपातीमध्ये ओट्सचा पावडर देखील मिक्स करु शकतो. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहू शकते. 5 / 7गव्हाच्या पीठात आपण मेथी दाण्याचा पावडर देखील मिसळू शकतो. यामुळे आपली पचनशक्ती सुधारेल. पोटाच्या आरोग्यासाठी हे चांगले आहे. 6 / 7ओवा हा आपण साधरणत: पराठे किंवा पुऱ्यांमध्ये घालतो पण गव्हाच्या पिठात देखील घातल्याने याची चव सुधारते. यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होते. 7 / 7पीठ मळताना त्यात बेसनाचे पीठ आणि मीठ घाला. यामुळे चपाती चांगली फुगेल. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे आपल्या हाडांना अधिक मजबूत करते.