उडुपी स्टाईल दाट सांबार घरीच करा; ९ टिप्स, हॉटेलसारखा परफेक्ट चवीचा होईल सांबार
Updated:February 6, 2026 16:17 IST2026-02-05T20:22:49+5:302026-02-06T16:17:39+5:30
How To Make Udupi style sambar at home : सांबार मसाला फोडणीत जळू न देता तो डाळ आणि भाज्या उकळताना घालावा म्हणजे सुगंध टिकून राहतो.

सांबारला हॉटेलसारखी अस्सल चव आणि सुंगध येण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How To Make Udupi style sambar at home)
सांबारसाठी नेहमी चांगल्या प्रतीची तूप डाळ वापरा आणि ती पूर्णपणे मऊ शिजवून व्यवस्थित घोटून घ्या. (Easy Way To Make Udupi Style Sambar At Home)
शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा आणि छोटे कांदे यांचा वापर केल्यास सांबारला नैसर्गिक चव येते.
सांबार मसाला फोडणीत जळू न देता तो डाळ आणि भाज्या उकळताना घालावा म्हणजे सुगंध टिकून राहतो.
सांबारची चव संतुलित राहण्यासाठी त्याच चिंचेचा कोळ आणि चवीपुरता गूळ आवर्जून घाला.
फोडणी देताना खोबरेल तेल किंवा तुपाचा वापर करा आणि त्यात भरपूर कढीपत्ता, हिंग आणि मोहोरी घाला.
सांबार मसाला घातल्यानंतर तो मंद आचेवर किमान १० ते १५ मिनिटं उकळू द्या. ज्यामुळे मसाल्यांचा अर्क डाळीत नीट उतरतो.
हॉटेलसारखा लाल रंग हवा असेल तर फोडणीत थोडं कश्मिरी लाल तिखटाचा वापर करा.
सांबार तयार झाल्यावर शेवटी वरून भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. ज्यामुळे सांबारला छान चव येईल.