अण्णाच्या गाडीवर मिळतो तसा कुरकुरीत मेदू वडा घरीच करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट होतील वडे
Updated:November 12, 2025 15:35 IST2025-11-12T15:02:34+5:302025-11-12T15:35:19+5:30
How to make south indian style medu vada at home : वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावे.

विकत मिळतो तसा कुरकुरीत, गोल गरगरीत मेदू वडा घरीच करणं खूपच सोपं आहे त्यासाठी काही टिप्स पाहूया. (How to make south indian style medu vada)
वड्यांसाठी फक्त उडीद डाळ वापरा. ही डाळ किमान ४ ते ५ तास किंवा रात्रभर पुरेशी भिजवत ठेवा. (Medu vada Making Tips)
डाळ वाटताना मिक्सरमध्ये अगदी थोड्या पाण्याचा वापर करा. पीठ अगदी घट्ट आणि मऊसर असंल पाहिले. पातळ पीठ झाल्यास वडा गोल होणार नाही.
पीठ वाटल्यावर ते एका दिशेनं चांगलं फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरते आणि वडा हलका आणि फुललेला बनतो.
पीठ फेटले आहे की नाही हे तपासण्यासाठी थोडं पाणी पाण्यात टाका. पीठ तरंगले तर ते योग्यरित्या फेटले गेले आहे.
पिठात बारीक चिरलेला कांदा, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला यामुळे परफेक्ट चव येते.
वडा तळण्यापूर्वी हाताला पाणी, तेल लावा. यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि त्याला गोल आकार येतो.वड्याला गोल छिद्र पाडल्यानं तो आतून आणि बाहेरून समानपणे तळला जातो आणि कुरकुरीत होतो.
वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावे. तेल खूप जास्त गरम असल्यास वडा बाहेरून लगेच करपतो आणि आतून कच्चा राहतो.
मंद ते मध्य आचेवर वडे सोनेरी होईपर्यंत तळा. यामुळे तो बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतो.
शक्य असल्या वड्याच्या पिठात खाण्याचा सोडा वापरणं टाळा. कारण फेटलेल्या पिठानं नैसर्गिकरित्या वडा फुलतो.