थंडीत चपात्या वातड पडतात-काठ कडक होतात? ८ टिप्स, ४ दिवस मऊसूत-नरम राहतील चपात्या
Updated:December 3, 2025 10:45 IST2025-12-03T10:28:00+5:302025-12-03T10:45:56+5:30
How To Make Softest Chapati : चपाती दोन्ही बाजूंनी फक्त हलकेच शिजेपर्यंत भाजा. जास्त भाजल्यास ती कडक होते.

चपात्या (Chapati) केल्या की लगेच वातड होतात मऊ राहत नाहीत अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. थंडीच्या दिवसांत चपात्या मऊ राहण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर चपात्या कडक होणार नाहीत मऊ राहतील. (How To Make Softest Chapati)
भाजलेल्या चपात्या एका सुती कापडात गुंडाळा आणि नंतर त्या कापडासकट एका हवाबंद डब्यात ठेवा. कापड चपात्यांमधील ओलावा शोषून घेते आणि चपात्या वातड होत नाहीत. (How To Keep Chapati Warm For Long Time)
जर चपात्या फारच वातड होत असतील तर तव्यावर भाजताना पाण्याचा हलकासा हात भाजा. यामुळे चपातीतील ओलावा टिकून राहतो. ( How To Keep Chapati Warm For Long Time Without Getting Soggy)
चपाती लाटताना तेलकट गोळ्यांसाठी मैद्याचा वापर टाळा. शक्यतो कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करा. या टिप्सचा वापर केल्यास चपात्या मऊसूत, लुसलुशीत राहतात.
कणीक भिजवताना त्यात १ ते २ चमचे तेल किंवा तूप घातल्यास चपातीला मऊपणा येतो.कणीक घट्ट न ठेवता अगदी मऊ भिजवा. जास्त मऊ कणीक असल्यास चपात्या मऊसूत होतात.
चपाती करण्यापूर्वी कणकेला पुन्हा ५ मिनिटं चांगलं मळून घ्या यामुळे त्यातील हवा बाहेर पडून कणीक एकसारखी होते.
चपाती लाटून झाल्यावर ती टाकण्याआधी तवा चांगला तापलेला असावा. कमी तापलेल्या तव्यावर टाकल्यास चपाती कडक होते.
चपाती दोन्ही बाजूंनी फक्त हलकेच शिजेपर्यंत भाजा. जास्त भाजल्यास ती कडक होते.
चपाती तव्यावरून काढल्यावर गरम असतानाच तिला लगेच हलकं तूप किंवा तेल लावा.