कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

Updated:November 17, 2025 19:20 IST2025-11-17T19:15:15+5:302025-11-17T19:20:02+5:30

how to make soft rotis : roti making hacks : kitchen hacks for soft rotis : चपात्या दिवसभर मऊ आणि लुसलुशीत ठेवण्यासाठी खास ५ ट्रिक्स...

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

बऱ्याच घरातील गृहिणी दिवसभराच्या चपात्या एकदम एकाचवेळी करतात. सकाळी (kitchen hacks for soft rotis) तयार केलेल्या या चपात्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत मऊ - लुसलुशीत राहात नाहीत, उलट त्या कडक, वातड होतात आणि त्यांची चवही बिघडते, त्यामुळे जेवणाची मजा कमी होते.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

चपाती तयार करण्याची कृती खूप सोपी असली तरी, चपातीचा मऊ - लुसलुशीतपणा (how to make soft rotis) दिवसभर टिकवून ठेवणे हे प्रत्येक गृहिणीसाठी एक मोठे आव्हान असते. परंतु काही सोप्या टिप्स आणि युक्त्या आहेत. अगदी फारशी मेहेनत न घेता आणि काही सहज सोप्या ट्रिक्स वापरून आपण चपात्या दिवसभर मऊ आणि लुसलुशीत ठेवू शकतो, यासाठी नेमकं काय करायचं आणि कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ते पाहूयात.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

कणीक मळण्यासाठी गरम पाणी किंवा दुधाचा वापर करा. कणीक मळल्यानंतर, ती ओल्या कापडाने झाकून कमीतकमी १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा. कणीक मळून थोडा वेळ तसेच ठेवल्याने त्यात ग्लूटेन तयार होते, ज्यामुळे चपात्या मऊ होतात.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

कणीक मळताना थंड पाण्याऐवजी गरम पाणी किंवा दुधाचा वापर केल्याने कणीक मऊ - लुसलुशीत होते. यामुळे कणीक मऊ आणि सहज लाटता येण्याजोगी होते. दुधामुळे कणकेला एक चांगली चव देखील येते आणि चपात्या न सूकता जास्त काळ मऊ - लुसलुशीत ठेवायला मदत होते.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

कणीक मळल्याबरोबर लगेच चपात्या करू नका. कणकेला किमान २० ते ३० मिनिटे झाकून विश्रांती द्या. यामुळे गव्हाच्या पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि चपात्या फुगून मऊ होतात.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

चपात्या लाटताना लाटण्यावर जास्त जोर देऊ नये. जास्त दाब किंवा असमान लाटण्यामुळे काही भाग कडक होऊ शकतो, तर उर्वरित भाग चिवट किंवा वातड राहू शकतो. एकसमान जाडीच्या पातळ चपात्या करण्यासाठी त्यांना हळूवारपणे लाटा. खूप पातळ चपात्या लवकर कोरड्या होतात, तर मध्यम जाडी दिवसभर मऊ राहते.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

जर चपात्या खूप मोठ्या आचेवर भाजल्या तर त्या बाहेरून लवकर तपकिरी होतील आणि आतून कच्च्या राहू शकतात. चपाती नेहमी मध्यम आचेवर शेका. शेकताना जास्त वेळ न लावता दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेका आणि फुगवताना लगेच काढून घ्या. जास्त वेळ शेकल्यास चपाती कडक - वातड होते. चपाती एका बाजूने ५०% आणि दुसऱ्या बाजूने ७०% शेकल्यावर थेट गॅसवर ठेवून फुलवा.

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

चपाती शिजवल्यानंतर लगेच त्यावर तेल किंवा साजूक तुपाची एक पातळ लेअर लावा. यामुळे चपातीतील आर्द्रता टिकून राहते आणि ती मऊ व चविष्ट होते. याव्यतिरिक्त, चपातीच्या रंगाला थोडी चमक येते आणि तुपाचा चांगला स्वाद देखील येतो.