गुलाबजाम तळताना फुटतात- कडक होतात? ६ सोप्या टिप्स, तोंडात टाकताच विरघळतील मस्त
Updated:June 25, 2025 17:29 IST2025-06-25T17:24:55+5:302025-06-25T17:29:00+5:30
gulab jamun frying mistakes: why gulab jamun breaks in oil: गुलाबजाम करताना कधी साखरेचा पाक नीट होत नाही, काही वेळा तळताना तो फुटतो. अशावेळी काय करायला हवे पाहूया.

भारतीय सणांची चव ही गोडाच्या पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. त्यात गुलाबजाम म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. खवा-मावा वापरुन पूर्वी गुलाबजाम तयार केला जात असतं. (gulab jamun frying mistakes)
सध्या गुलाबजाम करण्यासाठी रेडीमेड पीठ मिळते ज्यामुळे गुलाबजाम करणं सोपं झालं आहे. परंतु गुलाबजाम करताना कधी साखरेचा पाक नीट होत नाही, काही वेळा तळताना तो फुटतो. अशावेळी काय करायला हवे पाहूया. (why gulab jamun breaks in oil)
गुलाबजाम करताना पिठाचा गोळा व्यवस्थित मळा. यासाठी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळा. जास्त पीठ किंवा कोरडे पीठ वापरल्यास गुलाबजाम फुटतात.
कधीही गुलाबजाम तळताना गॅस मंद आचेवर ठेवावा. कडक गरम तेलात गुलाबजाम तळल्यास ते बाहेर लाल होतात आणि आतून कच्चे राहतात.
गुलाबजाम करताना त्यात बेकिंग सोडा किंवा इनोचे प्रमाण जास्त झाल्यास गुलाबजाम मऊ होण्याऐवजी ते कडक होतात.
गुलाबजाम करताना त्यात बेकिंग सोडा किंवा इनोचे प्रमाण जास्त झाल्यास गुलाबजाम मऊ होण्याऐवजी ते कडक होतात.
पाकात गुलाबजाम घातल्यानंतर जास्त वेळ ढवळू नका, त्यामुळे ते फुटू शकतात. गुलाबजाम बनवताना मावा किंवा खवा चांगल्या प्रतीचा असावा.
पिठात थोडंसं तूप किंवा तेल घातल्यास गुलाबजाम मऊ होतात. तसेच ते थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात ठेवा.