चपाती फुगतच नाही-वातड होते? ७ टिप्स, तव्यावर दुप्पट फुगेल- मऊसूत राहील
Updated:January 20, 2026 18:49 IST2026-01-20T16:28:56+5:302026-01-20T18:49:13+5:30
How To Make Soft Chapati : पीठ मळताना त्यात थोडं तेल किंवा तुपाचं मोहन आणि चिमूटभर मीठ घाला. पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर केल्यास चपाती अधिक मऊ होते.

चपाती मऊ आणि टम्म फुगलेली होण्यासाठी पीठ मळण्यापासून ते चपाती भाजण्यापर्यंत अनेक छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. चपाती लाटताना आणि पिठाची पूर्वतयारी करताना ७ टिप्स नक्की कामी येतील. (How To Make Soft Chapati)
पीठ मळताना त्यात थोडं तेल किंवा तुपाचं मोहन आणि चिमूटभर मीठ घाला. पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर केल्यास चपाती अधिक मऊ होते. (Perfect Chapati Making Tips Cooking Hacks)
पीठ मळल्यानंतर त्यावर ओला कपडा ठेवून झाकण ठेवून किमान १५ ते २० मिनिटं बाजूला ठेवा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि चपाती लाटायला सोपी जाते.
लाटताना पिठाचा गोळा छोटा गोल लाटून घ्या. त्यावर थोडं तेल किंवा कोरडं पीठ पसरवून घ्या. त्यानंतर त्याची त्रिकोणी किंवा चौकोनी घडी करा. यामुळे चपातीला छान पदर सुटतात आणि मऊ राहते.
चपाती लाटताना ती चिकटू नये म्हणून आपण कोरडं पीठ लावतो. पण कोरड्या पिठाचा वापर कमीत कमी करा. जास्त पीठ लावल्यास भाजताना चपाती कडक किंवा पांढरट होते.
चपाती लाटताना ती मध्यभागी जाड आणि कडांना पातळ अशी नसावी. सर्व बाजूंनी एकसारख्या जाडीची लाटल्यास ती छान फुगते आणि कडा कच्च्या राहत नाहीत.
लाटण्यावर खूप जास्त जोर देऊन चपाती लाटू नका. हलक्या हातानं लाटल्यास चपातीतील हवा टिकून राहते. ज्यामुळे ती भाजताना छान फुगते.
चपाती तव्यावरून काढल्यानंतर ती सुती रुमालात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे चपाती जास्तवेळ मऊ राहते.